Govt Job: फ्रेशर्स उमेदवारांची चिंताच मिटली! भारत सरकारच्या कंपनीत मिळवा नोकरी, कधीपर्यंत कराल अर्ज?
भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) कडून वेगवेगळ्या विभागांसाठी जूनिअर एक्झिक्यूटिव्ह (JE) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची संधी

फ्रेशर्स उमेदवार सुद्धा करू शकतात अर्ज

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?
Govt Job 2025: सरकारी नोकरीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणांसाठी भारत सरकारच्या कंपनीत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (BEML) कडून वेगवेगळ्या विभागांसाठी जूनिअर एक्झिक्यूटिव्ह (JE) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. खरंतर, संबंधित क्षेत्रात कामाचा अनुभव नसलेले म्हणजेच फ्रेशर्स तरुण सुद्धा या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात.
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना www.bemlindia.in या BEML च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.
या पदांसाठी निघाली भरती
या भरतीच्या माध्यमातून एकूण 119 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
- जेई मेकॅनिकल (JE Mechanical)- 88 रिक्त पदे
- जेई इलेक्ट्रिकल (JE Electrical)- 18 रिक्त पदे
- जेई मेटलर्जी (JE Metallurgy)- 02 रिक्त पदे
- जेई आयटी (JE IT)- 01
- जेई फायनान्स (JE Finance)- 08 रिक्त पदे
- जेई राजभाषा- 02 रिक्त पदे
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं कमाल वय 29 वर्षे असणं अनिवार्य आहे.