Nandurbar crime : नंदूरबार शहरातील बाजारपेठेच्या परिसरात एका किरकोळ वादातून तरुणावर चाकूने सपासप वार करत हत्या केली. ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं नंदुरबार शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता आदिवासी समाज हा संतप्त झाल्याचं दिसून येत आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात हत्येच्या निषेधार्थ मुक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं आहे. आंदोलकांनी काही वाहनांची तोडफोड केल्याचं चित्र आता समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : चंद्रपूर हादरलं! NEET ला होते 99.99 टक्के, 'या' वैद्यकीय महाविद्यालयात मिळाला प्रवेश, तरीही 'त्या' एका कारणावरून तरुणानं केली आत्महत्या
तरुणावर चाकूने सपासप वार
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात भैय्या मराठे नावाच्या एका तरुणाने जय भिल या तरुणावर किरकोळ वादातून चाकूने सपासप वार केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी हलवण्यात आले असता त्याचा मृत्यू झाला. तरुणाच्या आदिवासी समाज बांधव आक्रमक झाला असून नंदुरबार शहरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झालेली बघायला मिळत आहे.
खूनच्या निषेधार्थ मोर्चा
आदिवासी युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ 24 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मूक मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं होतं. मोर्चा शांततेत पार पडल्यानंतर गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस आणि आंदोलकांमध्ये दगडफेक झाली असता, पोलिसांनी जमाव नियंत्रणात आणण्यासाठी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. या घटनेनं संतापाची लाट उसळली आहे.
हे ही वाचा : 2 महिन्यांवरती आलं होतं शिक्षिकेचं लग्न, शाळेतून घरी जात असताना चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, कुटुंबियांनी सांगितला धक्कादायक प्रकार
या एकूण घडलेल्या संवेदनशील परिस्थितीत काहीजण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणात एक पोलीस अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते देखील जखमी झाल्याचं वृत्त आहे. या मोर्चात आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करण्यात आली होती.
ADVERTISEMENT
