2 महिन्यांवरती आलं होतं शिक्षिकेचं लग्न, शाळेतून घरी जात असताना चेहऱ्यावर फेकलं अॅसिड, कुटुंबियांनी सांगितला धक्कादायक प्रकार
crime news : एका शिक्षिकेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 2 महिन्यांवर विवाह आला असताच एका तरुणाने शिक्षिकेवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण आता समोर आलं आहे. स्थानिकांनी असं कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात आवाज उठवताच आरोपी तरुणाने घटनास्थळावरून धाव घेत पळ काढला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शिक्षिकेवर अॅसिडने हल्ला

2 महिन्यांवर आलं होता विवाह

नेमकं काय घडलं?
crime news : एका शिक्षिकेसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. 2 महिन्यांवर विवाह आला असताच एका तरुणाने शिक्षिकेवर अॅसिड हल्ला केल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. स्थानिकांनी असं कृत्य करणाऱ्या तरुणाविरोधात आवाज उठवताच आरोपी तरुणाने घटनास्थळावरून धाव घेत पळ काढला. कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली असता, पीडितेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्रथमोपचार केले आणि नंतर तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्यास सांगितले. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील नखासा पोलीस ठाणे परिसरात घडला होता.
हे ही वाचा : पुणे हादरलं! कोंढव्यात पैशांवरून वाद, घरात घुसून वडिलांना शिवीगाळ, भांडण सोडवणाऱ्या शाळकरी मुलावर सपासप वार
शिक्षिकेवर तरुणाकडून अॅसिड हल्ला
दुचाकीवरून हेल्मेट घातलेल्या एका तरुणाने शिक्षिकेच्या चेहऱ्यावर आणि पोटावर अॅसिडने हल्ला केला असता, शिक्षिका जागीच कोसळली. स्थानिकांनी आरडाओरड केली आणि अॅसिड हल्लेखोराने घटनास्थळावरून पळ काढला होता. अशा स्थितीत, एका वृद्ध स्थानिक व्यक्तीने शिक्षिकेला उचलून नेले. शिक्षिकेनं तिच्या कुटुंबाला अॅसिडने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबियांनी भाजलेल्या शिक्षिकेला संभळ जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात नेले.
दरम्यान, नखासा पोलीस ठाणे परिसरातील संभळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी अॅसिड हल्ल्यात भाजून निघालेल्या शिक्षिकेनं आपला जबाब नोंदवला आहे. पीडित तरुणी ही तब्बल 25 टक्के भाजून निघाली आहे. प्राथमिक उपचारानंतर शिक्षिकेला उच्च रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
शिक्षिकेचं दोन महिन्यावर आले होतं लग्न
अॅसिड हल्ल्यात भाजून निघालेल्या शिक्षिकेचं लग्न दोन महिन्यावर आले होते. शिक्षिकेच्या म्हणण्यानुसार, पीडितेवर हल्ला करणाऱ्या तरुणाला यापूर्वी कधीही पाहिलं नाही. पोलीस सध्या या प्रकरणाच्या प्रत्येक बाजूने तपास करत आहेत.