धाराशिवच्या दिव्यांग शेतकऱ्याच्या डोक्यावर 40 लाखांचं कर्ज, 15 हजार कोंबड्या पुरात गेल्या वाहून गेल्या, उर बडवत टाहो फोडला

Marathwada flood : एका अंपग शेतकऱ्याच्या 15 हजार कोंबड्या देखील पूराच्या पाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे. एवढंच नाही,तर शेतकऱ्यावर 40 लाखांचं कर्ज देखील होतं. आता हे कर्ज कसं फेडता येईल असं म्हणत शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं असून शेतकरी धायमोकलून रडला आहे.

marathwada flood

marathwada flood

मुंबई तक

26 Sep 2025 (अपडेटेड: 26 Sep 2025, 06:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

15 हजार कोंबड्या पूराच्या पाण्यात

point

डोक्यावर 40 लाखांचं कर्ज

point

शेतकरी बापाची कहाणी

Marathwada flood : मराठवाडा विभागातील बीड, धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांवर मोठा कर्जाचा बोजा आहे. काढणीला आलेली पिकं सारी वाहून गेल्याने आता कर्ज तरी कसं फेडणार? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित होताना दिसतो. आता धाराशीव जिल्ह्यातील एका कीर गावातील शेतकऱ्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. अख्ख्या संसाराची राखरांगोळी झालेली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील एका अंपग शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधून 15 हजार कोंबड्या देखील पूराच्या पाण्यात वाहून गेल्याचं चित्र आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Nashik Crime : मैत्रिणीने चहा प्यायला कॅफेत बोलावलं, नंतर हल्लेखोरांना मेसेज करत दिली टीप, तरुणावर कोयत्याने सपावप वार

अपंग शेतकऱ्यावर तब्बल 40 लाखांच्या कर्जाचा बोजा

अशातच धाराशिव जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या उक्कड गावातील सुरेश मुंडे नावाच्या एका अपंग शेतकऱ्यावर तब्बल 40 लाख रुपायांच्या कर्जाचा बोजा होता. अशातच या अतिवृष्टी परिस्थितीत शेतकऱ्याच्या 15 हजार कोंबड्या देखील वाहून गेल्याचं मन हेलावून टाकणारं चित्र समोर आलं आहे. डोक्यावर कर्ज असल्याने सुरेश मुंडे हे महिन्याला एक लाखांचा हप्ता भरायचे. आता पुढे इथून पुढं कसं होणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

अशातच सुरेश मुंडे हे अपंग असल्याने आणखीच परिस्थिती अवघड होऊन बसली. सरकारने मदत करून माझा व्यवसाय वाचवावा अशी मागणी सुरेश मुंडे यांनी केली आहे. दरम्यान, या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचं वाटोळं होऊन बसलं आहे. बळीराजा हवालदिल झाला असून कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रूंचा बांधा फुटला आहे.

हे ही वाचा : साडी नेसवलेल्या मामा पगारेंना राहुल गांधींचा फोन म्हणाले, 'आम्हाला तुमचा आदर..' नेमका काय संवाद झाला?

संसारासह लहान मुलांची पुस्तकं, कपडे, गणवेश सर्व काही पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. अनेकांच्या गोठ्यातील गुरं वाहून गेली आहेत. सत्तेत असलेले नेते आता शेतकऱ्यांच्या पाहणीसाठी बांधावर गेले असता, शेतकऱ्यांनी नेत्यांचा ताफा आडवला होता. अनेक शेतकऱ्यांनी आपला उर बडवून आक्रोश व्यक्त केला आहे. सुरेश मुंडेंप्रमाणे इतर काही शेतकरीही कर्जमाफीची मागणी करू लागले आहेत. 

    follow whatsapp