Nashik Crime : मैत्रिणीने चहा प्यायला कॅफेत बोलावलं, नंतर हल्लेखोरांना मेसेज करत दिली टीप, तरुणावर कोयत्याने सपावप वार

मुंबई तक

nashik crime : पूर्वनियोजित कटातून एका तरुणाची कोयता आणि चॉपर या धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेनं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

ADVERTISEMENT

nashik crime
nashik crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पूर्वनियोजित कटातून तरुणाचा खून

point

घटनेनं नाशिक हादरून गेलं

point

नेमकं काय घडलं?

Nashik Crime : पूर्वनियोजित कटातून एका तरुणाची कोयता आणि चॉपर या धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आला आहे. या घटनेनं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिकच्या पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील एका कॅफेमध्ये 25 सप्टेंबर रोजी गुरुवारी हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं नाशिक हादरून गेलं आहे, हा धक्कादायक प्रकार घडताच मृताच्या नातेवाईकांसह इतर काही लोक जमल्याने घटनास्थळी सुरक्षापथक दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव रशिद हारून खान (वय 22) असे आहे.

हे ही वाचा : साडी नेसवलेल्या मामा पगारेंना राहुल गांधींचा फोन म्हणाले, 'आम्हाला तुमचा आदर..' नेमका काय संवाद झाला?

पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून 

संबंधित प्रकरणात पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आल्याचं कारण आता समोर आलं आहे. अंबडला जोडणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या दत्तनगर आणि खाडी परिसरातील रहिवासी असलेल्या राशिवर त्याच्याच परिसरातील गॅस गँगच्या टोळक्यांनी काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. त्यानंतर संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांकडून कसलीही कठोर कारवाई केली गेली नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.

मैत्रिणीने चहा प्यायला बोलावून टीप दिली 

पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील निसर्ग कॉलनीतील एका कॅफेत राशिदला त्याच्या मैत्रिणीने चहा प्यायला बोलावले होते. त्यानंतर संबंधित तरुणीने राशिद आल्याची माहिती दिली, असं पोलिसांनी तपासातून सांगितलं आहे.

हल्लेखोर घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी राशिदवर कोयत्याने आणि चॉफरने वार केले. संबंधित घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची पाहणी केली असता, मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला. तेव्हा रुग्णलायाबाहेर मोठ्या प्रमाणात नातेवाईकांनी गर्दी केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp