साडी नेसवलेल्या मामा पगारेंना राहुल गांधींचा फोन म्हणाले, 'आम्हाला तुमचा आदर..' नेमका काय संवाद झाला?
Mama Pagare : राहुल गांधी यांनी मामा पगारेंना फोनद्वारे संपर्क करत साधला संवाद, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

मामा पगारे यांना राहुल गांधींचा फोन

नेमकं काय संभाषण झालं?
Mama Pagare : डोंबिवलीत काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ पधादिकारी प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी जबरदस्ती साडी नेसवली होती. त्यांच्या या कृतीमुळे मामा पगारे केवळ राज्यातच नाही,तर देशभरात अपमानीत झाले. याची दखल आता काँग्रेस खासदार आणि नेते राहुल गांधी यांनी घेतली आहे. त्यांनी थेट मामा पगारे यांना फोनद्वारे संपर्क करत संवाद साधला आहे. त्यामुळे आता हे प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : बीड हादरलं! बर्थडे पार्टीत झाला वाद, नंतर मित्रानेच मित्राच्या छातीवर चाकूने वार करत केला खून, घटनेचा रक्तरंजीत थरार
राहुल गांधींचा मामा पगारेंना फोन
राहुल गांधी यांनी पगारे मामांना फोन करत धीर दिला. ते म्हणाले की, पगारे मामा तुम्ही घाबरू नका काँग्रेस पक्ष हा तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही गेली 50 वर्षे या काँग्रेस पक्षात काम करता, त्यामुळे आम्हाला तुमच्याबाबत खूपच आदर आहे. या वेळी भावूक झालेल्या मामा पगारे यांनी आपल्यासोबत झालेला सर्व प्रकार राहुल गांधींना सांगितला. एवढंच नाही,तर मामा पगारे यांनी राहुल गांधी यांना मुंबईत आल्यावर मला लवकर भेटा, असे ते म्हणाले होते.
दरम्यान, डोंबिवलीत घडलेल्या या प्रकरणाने काँग्रेस कार्यकर्त्यांमघ्ये संताप पसरला आहे. त्यानंतरच राहुल गांधी यांनी मामा पगारेंना फोनद्वारे संपर्क करत संवाद साधला. यामुळे आता काँग्रेस पदाधिकारी आणि पगारे मामांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा : Maharashtra Weather: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीत काही दिवसांआधी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोर्फ केलेला फोटो व्हायरल केला होता. त्यानंतर भाजपचे पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते प्रकाश उर्फ मामा पगारे यांना भर रस्त्यात बोलावून साडी नेसवली होती. हे प्रकरण केवळ राज्यातच नाही,तर देशभरात पोहोचलं. संबंधित प्रकरणात काही जणांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आलेत. गुन्हा दाखल करणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब, पदाधिकारी संदीप माळी, दत्ता माळेकर यांच्यासह एकूण 18 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.