बीड हादरलं! बर्थडे पार्टीत झाला वाद, नंतर मित्रानेच मित्राच्या छातीवर चाकूने वार करत केला खून, घटनेचा रक्तरंजीत थरार

मुंबई तक

Beed Crime : बीडमध्ये एका स्थानिक पत्रकाराच्या मुलावर त्याच्याच मित्राने चाकूने छातीवर सपासप वार करत संपवलं.

ADVERTISEMENT

Beed Crime
Beed Crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बीडमध्ये मित्राचाच मित्राने केला खून

point

बर्थडे पार्टीत झाला वाद

point

गुरुवारी दिवसाढवळ्या गुन्हा

Beed Crime : बीडमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखच्या हत्येनंतर गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या मुलावर त्याच्याच मित्राने चाकूने छातीवर सपासप वार करत संपवलं. यश देवेंद्र ढाका (वय 22) असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील देवेंद्र ढाका हे स्थानिक वर्तमान पत्राचे पत्रकार होते. ही घटना 24 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री घडली असल्याचं सांगण्यात येतंय.

हे ही वाचा : Maharashtra Weather: मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान खात्याचा धडकी भरवणारा अंदाज

नेमकं 'त्या' रात्री काय घडलं? 

या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. वादाचं कारण आता समोर आलं आहे. यश ढाका याचे त्याच्याच मित्रासोबत एका बर्थडे पार्टीत वाद झाला होता. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. त्यानंतर 24 सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री त्या दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. तेव्हा दोघांमधील वाद वाढत गेला असता, त्याच्याच मित्राने यशवर चाकूने सपासप वार केले.

गुन्हेगाराला अटकेची मागणी 

तेव्हा घटनास्थळी असलेल्या काही लोकांना यशला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यशवर उपचार सुरु असताना डॉक्टरांनी यशला मृत घोषित केले. एका पत्रकाराच्या मुलाचा खून झाल्याने बीडमध्ये एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. खून प्रकरणाची ही घटना समजताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात तसेच पोलीस अधीक्षक कार्यालायात मोठी गर्दी केली होती.

हे ही वाचा : 'मतचोरीच्या विरोधात योग्य वेळी सर्जिकल स्ट्राईक करेन, ती वेळ आताच सांगणार नाही', आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

दरम्यान, संबंधित प्रकरणात आरोपीच्या तात्काळपणे बेड्या घालाव्यात अशी मागणी जोर धरू लागत आहे. दरम्यान पोलिसांनी सुरज काके नावाच्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. दरम्यान, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. संतोष देशमुख प्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारीचा खुलासा झाला. त्यानंतर कुठेतरी गुन्हागारी कमी होईल असे वाटत होतं, पण तशी परिस्थिती दिसत नाही. 

हे वाचलं का?

    follow whatsapp