Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरातील वर्दळ असलेल्या पैठणगेट परिसरात 10 नोव्हेंबर रोजी सोमवारी मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अगदी क्षुल्लक करणावरून हा वादंग निर्माण झाला आहे. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाल्याचे दिसून येते. मृत तरुणाचे नाव इमरान अकबर कुरैशी (वय 33) असे आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : कोल्हापूरात बिबट्याची दहशत, थेट पोलिसांवरच केला हल्ला, घटनेचा थरार व्हिडिओत पाहा
गाडीच्या पार्किंगवरून वाद, रागाच्या भरात मानेवर वार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये झालेल्या वादाच्या चार दिवसांपूर्वीच इमरान हा अंडा भुर्जीच्या गाडीवर जेवण करत होता. त्याने आपली मोटारसायकल एका मोबाईल दुकानाच्या समोर पार्क केली. तेव्हा मोबाईल दुकानदार परवेज शेखसोबत गाडीच्या पार्किंगवरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की, परवेजने रागाच्या भरात चाकूने इमरानच्या मानेवर चाकूने वार केले. तेव्हा काही वेळातच तो बेशुद्ध अवस्थेत जमीनीवर कोसळला.
घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी
या घटनेनंतर दुकानासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याने गर्दी झाली. त्याच रात्री काही ग्राहक मोबाईलमध्ये खरेदीत व्यस्त होते. सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे की, काही महिला फोन खरेदी करत होत्या. या हादरवून टाकणारं प्रकरण पाहता, परिसरात दहशत पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच, क्रांती चौकात पोलिसांनी धाव घेतली आणि रात्रीच्या सुमारास मुख्य आरोपी परवेज शेख आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली होती. संबंधित हल्लेखोराने परिसर हादरून टाकला होता. या घटनेनं स्थानिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले.
हे ही वाचा : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, तेजस्वी घोसाळकरांना धक्का; तुमच्या वार्डाची स्थिती काय?
या प्रकरणात पोलिसांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केलं आहे. इम्रानच्या अचानक मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब आणि परिसरातील लोकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT











