तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; अखेर विद्यार्थ्याने नको तेच.. भयंकर घडलं

मुंबई तक

• 01:41 PM • 07 Jun 2026

Crime News : व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर, विद्यार्थ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, नंतर त्याला व्हिडिओमुळे ऑनलाइन ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

व्हायरल व्हिडिओनं तरुणाचं टोकाचं पाऊल 

point

कचरा टाकल्याबाबत विद्यार्थ्याला ट्रोल केलं

Crime News : गोव्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्याच्या कडेला कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरल्यानंतर, विद्यार्थ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, नंतर त्याला व्हिडिओमुळे ऑनलाइन ट्रोलिंगला देखील सामोरे जावे लागले. नंतर त्याने कथितरित्या स्वत:वर गोळीबार केला. या घटनेनं परिसर हादरून गेला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : एक्स बॉयफ्रेंड भेटला अन् घडलं भयानक, वकील महिलेने 6 वर्षीय लेकीला का संपवलं?

व्हायरल व्हिडिओनं तरुणाचं टोकाचं पाऊल 

संबंधित प्रकरण गोव्यातील म्हसपा परिसरातील आहे. दरम्यान, गोळी झाडून घेतलेल्या मृत तरुणाची ओळख सॅम्युअल डी ब्रागांका (वय 23) अशी समोर आली. सॅम्युअल हा आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. तो पदवीचे शिक्षण घेत होता. दरम्यान, तो रस्त्याच्या कडेला कचरा फेकल्याचा व्हिडिओ समोर आला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. 

कचरा टाकल्याबाबत विद्यार्थ्याला ट्रोल केलं

व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर लोकांनी त्यावर तीव्रपणे प्रतिक्रिया देखील दिल्या. सोशल मिडिया वापरकर्त्यांनी संबंधित व्हिडिओबाबत कारवाईची मागणी देखील केली. हे प्रकरण इतकं चिघळलं की, स्थानिल प्रशासन आणि पोलिसांनी हस्तक्षेप करत सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याबाबत विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल केला. 

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी विद्यार्थ्याला नोटीस देखील बजावली होती. दरम्यान अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तो पोलिसांसमोर हजर झाला असून तपासात सहकार्य करत आहे. या घटनेत वापरण्यात आलेल्या बंदुकीचा तपास देखील सुरू आहे. 

घरात मृतावस्थेत विद्यार्थी

दरम्यान, पीडित तरुणाचा मृतदेह हा घरात मृतावस्थेत आढळून आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याने कुटुंबाचा परवाना असलेल्या बंदुकीनेच स्वत:वर गोळीबार केला. नंतर त्याला तात्काळपणे रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

हे ही वाचा : Astrology : त्रिपुष्कर योग 2026, 'या' राशीचे भाग्य खुलणार

अशातच व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सॅम्युअल तणावाखाली आपलं जीवन जगत होता. सोशल मीडियावरील होणाऱ्या टीकेमुळे आणि चर्चेमुळे तो तरुण मानसिकदृष्ट्या हतबल झाला. नंतर काहीच तासांत त्याने स्वत:वर गोळी झाडून टोकाचं पाऊल उचललं.