Crime News : अनैतिक संबंधांमुळे सुखी कुटुंबात कलह निर्माण होऊन संसार उद्ध्वस्त होतो. अशा चुकीच्या नात्यांच्या नादात अनेकदा गंभीर गुन्ह्यांनाही तोंड फुटतं. अशाच एका अनैतिक नात्यामुळे एका विवाहित तरुणाचा बळी गेला आहे. नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय? घटना कशी घडली? आणि पोलिसांनी सत्य कसं उलगडलं? पाहूया सविस्तर माहिती.
ADVERTISEMENT
एका महिलेने स्वतःच्या पुतण्यावरच्या विकृत प्रेमामुळे पतीच्या खुनाचा डाव आखला. तिने आधी पतीला झोपेच्या गोळ्या देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर पुतण्याच्या मदतीने लाकडी तुकड्याने त्याच्या डोक्या-चेहऱ्यावर तडाखे देत निर्दयपणे हत्या केली. संपूर्ण रक्तरंजित प्रकारानंतर महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटा पवित्रा घेत गावातील तीन जणांवर खुनाचा आरोप केला. यातील दोघांना पोलिसांनी अटकही केली. पण पुढील तपासात आणि फॉरेन्सिक अहवालात समोर आलेल्या धक्कादायक तथ्यांनी सर्वांनाच हादरा दिला.
हेही वाचा : ठाणे: सूटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली! लिव्ह-इन-पार्टनरनेच केली हत्या... आरोपीला अटक
ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात घडली. साध पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या लक्ष्मणखेडा गावात राहणारा धीरेंद्र पासवान (वय 33) हा शेती करणारा तरुण घराबाहेरच्या खाटेवर रक्ताच्या तळ्यात मृतावस्थेत सापडला. त्याच्या पश्चात पत्नी रीना, चार वर्षांचा मुलगा ओनल आणि आई चंद्रवती असा परिवार आहे. पैशांच्या वादातून पतीची हत्या झाली असल्याचा आरोप रीनाने केला होता. तिने गावातील तीन पुरुषांना या खुनासाठी जबाबदार ठरवले. इतकंच नाही, भांडणाची माहिती पोलिसांना दिली होती पण कारवाई न केल्यामुळे हा जीव गेला, असेही तिने सांगितले. परंतु पतीच्या मृत्यूबाबत शोक करताना तोंडावर हात ठेवून रडणारी हीच महिला प्रत्यक्षात खुनाची सूत्रधार निघेल, याची कल्पना कुणाला नव्हती.
तपासादरम्यान उघड झाले की रीना हिचे तिच्याच पुतण्या सतीशसोबत अनैतिक संबंध होते. दोघांनी मिळून धीरेंद्रचा जीव घेतल्याचे समोर आले. धीरेंद्रला पत्नीच्या या संबंधांची कल्पना झाली होती, पण सतीश हा त्याच्या मोठ्या भावाचा मुलगा असल्याने तो त्याच्याविरुद्ध काही पाऊल उचलू शकत नव्हता. पत्नीचे हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धीरेंद्र घरात सीसीटीव्ही बसवणार असल्याची माहिती रीनाला मिळाली आणि मग तिने सतीशसोबत कट रचून पतीचा खून करण्याचे ठरवले.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कमला पसंद अन् राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सूनेची आत्महत्या, ओढणीने घेतला गळफास
ADVERTISEMENT











