ठाणे: सूटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली! लिव्ह-इन-पार्टनरनेच केली हत्या... आरोपीला अटक

मुंबई तक

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका नाल्याजवळ सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी तपास करत महिलेच्या लिव्ह-इन-पार्टनरला अटक केल्याची माहिती आहे.

ADVERTISEMENT

लिव्ह-इन-पार्टनरनेच केली हत्या...
लिव्ह-इन-पार्टनरनेच केली हत्या...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सूटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली!

point

लिव्ह-इन-पार्टनरनेच केली महिलेची हत्या

point

प्रकरणातील आरोपीला अटक...

Thane Crime: ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे एका नाल्याजवळ सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी समोर आली होती. सोमवारी (24 नोव्हेंबर) दुपारच्या सुमारास डोंबिवली शहरातील पलावा उड्डाणपुलाच्या खाली सूटकेसमध्ये सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी तपास करत महिलेच्या लिव्ह-इन-पार्टनरला अटक केल्याची माहिती आहे. 

महिलेच्या मनगटावर 'तो' टॅटू...

पोलीस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, आरोपीने 21 नोव्हेंबर रोजी प्रेयसीसोबत झालेल्या वादानंतर महिलेची निर्घृण हत्या केली आणि दुसऱ्या दिवशी मृतदेह नाल्याजवळ फेकला. प्रियंका विश्वकर्मा अशी मृत महिलेची ओळख समोर आली असून तिच्या मनगटाजवळ 'P V S' या अक्षरांचा टॅटू सापडला. मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी तो सूटकेसमध्ये भरून आणल्याचा पोलिसांचा आधीच संशय होता. सोशल मीडिया आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी देसाई गावातून विनोद श्रीनिवास विश्वकर्मा (50) नावाच्या व्यक्तीला अटक केली. 

हे ही वाचा: मुंबई: सूटकेसमध्ये 'त्या' अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह... डोंबिवलीतील खळबळजनक घटना!

लिव्ह-इन-पार्टनरची गळा दाबून हत्या 

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान आरोपीने महिलेची हत्या केल्याचा त्याचा गुन्हा कबूल केला. खरं तर, मृत महिला मागील पाच वर्षांपासून आरोपी तरुणासोबत राहत होती. 21 नोव्हेंबर रोजी रात्री तिचं तिच्या लिव्ह-इन-पार्टनरसोबत मोठा वाद झाला आणि याच भांडणात रागाच्या भरात आरोपीने महिलेचा गळा दाबून आत्महत्या केल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: गावात दिपांशूच्या मृत्यूची अफवा... नंतर, प्रेयसीने गळफास घेत संपवलं आयुष्य! प्रेमकहाणीचा 'असा' झाला शेवट

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपीने संपूर्ण दिवस मृतदेह आपल्या घरातच ठेवला. पण जेव्हा तो मृतदेह सडण्यास सुरूवात झाली आणि त्यातून दुर्गंधी पसरू लागली, तेव्हा त्याने मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि नाल्याजवळ जाऊन 22 नोव्हेंबरच्या रात्री पुलावरून फेकून दिला. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp