Crime News : नागपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई पोलीस उपनिरिक्षकाने कॉन्स्टेबल मित्राच्या पत्नीवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. संबंधित आरोपी हा मुंबईतील विनोबा भावे नगर पोलीस ठाणे येथील आहे. पीडित महिलेनं केलेल्या तक्रारीवरून, आरोपीविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : तोंडाला काळं फासलेले प्रवीण गायकवाड नेेमके कोण आहेत?
नेमकं 'त्या' रात्री काय घडलं?
घडलेल्या घटनेनुसार, पीडित महिला ही फेब्रुवारी 2024 मध्ये नागपूरच्या कोंढाळी भागात तिच्या पतीसोबत फिरायला गेली होती. तेव्हाच आरोपी उपनिरिक्षकही त्या ठिकाणी आला होता. रात्रीच्या वेळी पीडित महिलेला एकटं पाहून संबंधिताने तिच्यावर लैंगिक छळ केला असा पीडितेनं आरोप केला. यानंतर 13 मे रोजी तो नागपूरच्या हिंगणा परिसरातील तिच्या घरात घुसला आणि पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
या घडलेल्या घटनेचा प्रसंग तिनं लाजेपोटी कोणालाही सांगितली नाही. मात्र, आरोपीच्या हैवानी कृत्यात वाढ होऊ लागल्याने तिनं आपल्या पतीला घडलेली घटना सांगितली. यानंतर दोघांनीही कोंढाळी पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दाखल केली. आरोपी नराधमाला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मुंबईला दाखल झाले. दरम्यान, पीडित महिला ही गडचिरोली येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा दुसरा तिसरा कोणीही नसून पीडितेच्या पतीचाच मित्र आहे.
हेही वाचा : सांगलीत गुन्हेगाराचा दी एंड, एडक्याने आणि दगडाने ठेचून केली हत्या, नेमकं काय घडलं?
पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक छळाचा आरोप
पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक छळ केल्याचा हा पहिलाच आरोप नाही. यापूर्वीही अनेकदा पोलिसांवर लैंगिक छळाचा आरोप करण्यात आलेला होता. 2022 मध्ये ठाणे जिल्ह्यातील एका महिलेनं एका पोलीस कॉन्स्टेबलवर विनयभंगाचा आरोप केला होता. ऑक्टोबर 2023 मध्येही मुंबईमधील अंधेरी भागात महिला सहकाऱ्याने एका सहाय्यक पोलीस निरिक्षकाविरोधात मानसिक छळ आणि अनुचित वर्तवणुकीची तक्रार दाखल केली होती.
ADVERTISEMENT
