ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार, विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला पाजलं विष अन्...

Crime News :  कर्जबाजारी होऊन धाराशिवमधील एका तरुणाने स्वत:सह आपल्या कुटुंबाला विष पाजलं आहे. या घटनेनं धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात ही घटना घडली आहे. लक्ष्मण मारूती जाधव वय वर्षे 29 असे तरुणाचे नाव आहे.

crime news online rummy game is useless married man poisons wife and two children and suicide

crime news online rummy game is useless married man poisons wife and two children and suicide

मुंबई तक

16 Jun 2025 (अपडेटेड: 16 Jun 2025, 05:48 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कर्जबाजारी होऊन धाराशिवमधील एका तरुणाने स्वत:सह आपल्या कुटुंबाला पाजलं विष

point

ऑनलाईन रम्मीचा नाद लय बेकार

Crime News : कर्जबाजारी होऊन धाराशिवमधील एका तरुणाने स्वत:सह आपल्या कुटुंबाला विष पाजलं आहे. या घटनेनं धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात ही घटना घडली आहे. लक्ष्मण मारूती जाधव वय वर्षे 29 असे तरुणाचे नाव आहे. ऑनलाईन रम्मी खेळताना लक्ष्मण कर्जबाजारी झाला आणि त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : पतीने दिली समोशाची ऑर्डर, पत्नी वॉशरूमधूनच झाली गायब.. लग्नाच्या 10 व्या दिवशीच काय घडलं?

लक्ष्मण मारुती जाधव याला पत्ते खेळण्याचा नाद होता. तो ऑनलाईन रम्मी खेळत होता. या ऑनलाईन रम्मीच्या नादात लक्ष्मणच्या डोक्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहू लागला होता. यानंतर लक्ष्मण हा नैराश्यात आला होता. याच नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. संबंधित प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. 

लक्ष्मण हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तेजस्विनी नावाच्या एका तरुणीशी प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन वर्षांचा मुलगा होता. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, लक्ष्मण जाधव याने कर्जबाजारीपणाला कंटाळून मालकीची एक एकर जमीन तसेच जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विकली होती. यानंतरही तो कर्जबाजारीतून मुक्त झाला नव्हता. तो प्रचंड तणावात होता. त्याने रविवारी रात्री पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलांना विष देऊन मारलं आणि स्वत: आत्महत्या केली. 

हेही वाचा : नोकरीसाठी तरुणी मुंबईला आली आणि झाला अपेक्षाभंग, आत्महत्या केली अन् सुसाईड नोटमध्ये...

रविवारी रात्रीच्या सुमारास पत्नी तेजस्विनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष पाजलं. त्याने घरातच गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. यातून नेमकं कारण लवकरच समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

    follow whatsapp