नोकरीसाठी तरुणी मुंबईला आली आणि झाला अपेक्षाभंग, आत्महत्या केली अन् सुसाईड नोटमध्ये...
navi mumbai news : कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ राज्यातूनच नाही,तर परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. अशीच उत्तर प्रदेशातील कानपूरची तरुणी मुंबईमध्ये आली. ती एका कंपनीत काम करु लागली. पण तिचा अपेक्षाभंग झाल्याने तिनं आत्महत्या केली. तिचं नाव नंदिनी वय वर्षे 22 असं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कोनपूरहून तरुणीने नोकरीसाठी मुंबई गाठली

अपेक्षाभंगामुळं तिनं आत्महत्या केली
Navi Mumbai News : कुटुंबाची जबाबदारी पेलण्यासाठी केवळ राज्यातूनच नाही,तर परराज्यातून लोक मुंबईत येत असतात. उत्तर प्रदेशातील कानपूरहून एक तरुणी मुंबईमध्ये नोकरीसाठी आली होती. ती एका कंपनीत कर्मचारी म्हणून रुजू झाली. पण तिचा अपेक्षाभंग झाल्याने तिनं आत्महत्या केली. तिचं नाव नंदिनी (वय 22) आहे. तिनं आर्थिक चणचणीतूनच आपलं जीवन संपवल्याची घटना नवी मुंबईतील ऐरोलीत घडली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : आत्या अन् भाचीच्या बेडरूममध्ये बराच वेळ गप्पा, नातेवाईक येताच दिसल्या अशा स्थितीत की...
आर्थिक चणचणीतून केली आत्महत्या
नंदिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे नंदिनीनं कानपूर सोडून नवी मुंबई गाठली. त्यानंतर ती नवी मुंबईतील ऐरोलीतील सेक्टर 1 मध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली. तिला 12 हजार रुपये वेतन होते. या पैशातून घरभाडं आणि आई वडिलांच्या आजारपणाचा खर्च पेलावत नसल्याने तिनं आत्महत्या केली.
तिचे सहकारी गावी गेल्याने काही दिवसांपासून ती एकटीच राहू लागली होती. तिच्या बोलक्या स्वभावामुळे तिची शेजाऱ्यांशी चांगली मैत्री झाली होती. शनिवारपर्यंत तिनं कोणाशीही संपर्क केला नाही. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी रविवारी दुपारी बनावट चावीचा वापर करत बंद असलेला दरवाजा उघडला. अशावेळी तिचा गळफास घेतलेला मृतदेह दिसून आला.
डायरीत सुसाईड नोट
अशावेळी तिनं एका डायरीत मनातली सल व्यक्त करत सुसाईट नोट लिहिली. आत्महत्येपूर्वी तिनं डायरीत लिहिलं की, मिळणाऱ्या पगारातून काही भागत नसल्यानं आत्महत्या करत आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी तपास केला आहे.
हेही वाचा : पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?
महिला पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांनी सांगितलं की, तरुणीने आर्थिक अडचणीतूनच कानपूरला जाण्याचा निर्णय घेतला होता, असे तिनं मैत्रिणीला सांगितलं होतं. मुंबईत येऊन तिचा अपेक्षाभंग झाल्याने तिनं आत्महत्या केली. याबाबत तिच्या कुटुंबियांना कळवले असून यातील पुढील तपास अधिकपणे करता येईल.