आत्या अन् भाचीच्या बेडरूममध्ये बराच वेळ गप्पा, नातेवाईक येताच दिसल्या अशा स्थितीत की...
Crime News : उत्तर प्रदेशातील बांदामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आत्या आणि तिच्या भाचीचं एका बेडरुममध्ये मृतदेह आढळला आहे. दोघीही बराच वेळ एकाच बेडरूममध्ये होत्या. त्यानंतर त्यांनी आपली जीव दिला आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

बातम्या हायलाइट

आत्या आणि तिच्या भाचीचा बेडरुममध्ये मृतदेह

दोघींनी आत्महत्या केल्याचा संशय
Crime News : उत्तर प्रदेशातील बांदामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आत्या आणि तिच्या भाचीचा एका बेडरुममध्ये मृतदेह आढळला. दोघीही बराच वेळ एकाच बेडरूममध्ये होत्या. त्यानंतर दोघींनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्या आणि तिची भाची या दोघीही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी लक्ष्य घालत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
हेही वाचा : पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?
बेडरुममध्ये आत्या आणि भाचीचा मृतदेह, नेमकं घडलं काय?
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला असता, बेडरूममधून दोघींचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दोघींच्या मोबाईलची तपासणी केली. मृत भाचीचं वय वर्षे हे 14 आहे, तर नात्याने आत्या लागणाऱ्या मुलीचं वय वर्षे 16 आहे.
त्यांचे नातेवाईक बाहेर गेले असताना भाची आपल्या आत्याकडं आली आणि त्यानंतर त्या दोघीही बेडरूममध्ये गेल्या. त्यांनी एकमेकांशी बराच वेळ गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी उचललेलं पाऊल अगदी भायनक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आजूबाजूच्या लोकांनी दोघींच्यातील प्रेमसंबंधाबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणातील माहितीचा तपास करत आहेत. या घटनेची माहिती दोघांच्याही कुटुंबाला कळाली असता, कुटुंबियांमध्ये गोंधळ उडाला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.
हेही वाचा : गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...
पोलीस म्हणाले की, आत्याचं वय हे 16 आहे, तर भाचीचं वय हे 14 वर्षे आहे. दोघांचाही मृतदेह एका बेडरूममध्ये आढळून आला असून पोलीस या प्रकरणाची तपासणी करत आहेत. दरम्यान, पॉस्टमॉर्टमचे रिपोर्ट लवकरच येतील आणि मृत्यूचं कारण समोर येईल.