पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये भीषण आग; प्रवाशांचा जीव मुठीत, नेमकं घडलं काय?
Pune News : पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनं प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. या आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना आज सोमवार (16 जून) रोजी 7 वाजून 5 मिनिटांनी सकाळी घडली आहे. दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगातील टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनला आग

प्रवाशांची पळापळ झाल्याची माहिती समोर
Pune News : पुणे- दौंड रेल्वे मार्गावर धावत्या ट्रेनमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनं प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. या आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. ही घटना आज सोमवार (16 जून) रोजी 7 वाजून 5 मिनिटांनी सकाळी घडली आहे. दौंड-पुणे डेमू ट्रेनच्या तिसऱ्या बोगातील टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली आहे. या घटनेनं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. यावेळी प्रवाशांची पळापळ झाल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा : "धीरूभाई अंबानी पंपावर पेट्रोल चोरूनच कोट्यधीश...", अजित पवारांचं वादग्रस्त वक्तव्य
आग आणि धुराचा लोट पसरल्याने ट्रेनमधील प्रवासी गोंधळून गेले. आपला मोलाचा जीव वाचवण्यासाठी त्यांची पळापळ होऊ लागली. अशा स्थितीत एक व्यक्ती हा टॉयलेटमध्ये अडकल्याने त्याने आरडा आरड केली. परिस्थिती पाहून इतर प्रवाशांनी दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढलं. या शॉर्ट सर्किटमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु प्रवासी भयभीत झाल्याने गोंधळ उडाला.
नेमकं काय घडलं?
दौंड-पुणे डेमून ट्रेन दररोज सकाळी 7.5 वाजता दौंड रेल्वे स्थानकावरून पुण्याकडे रवाना होते. आज सोमवारी नेहमीप्रमाणे ट्रेन दौंडहून रवाना झाली. मात्र, दौंड-पुणे दरम्यान असणाऱ्या मार्गावरील, ट्रेनच्या इंजिनपासून तिसऱ्या बोगातील टॉयलेटला अचानक आग लागल्याने परिस्थिती गंभीर निर्माण झाली. एका छोट्याशा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आलीय. या आगीमुळे धुराचे लोट पसरले होते. प्रवाशांची पळापळ होताना दिसत आहे.
प्रवाशांची पळापळ
आग आणि धुरामुळे प्रवासी भयभीत झाले आहेत. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी धावपळ केली. काही प्रवाशांनी आरडाओरड केली. दरम्यान, प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी ट्रेनमधील आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवण्यास सांगितली. दरम्यान, आग लागली असताना टॉयलेटमध्ये एक प्रवासी अडकला होता. प्रवासी ओरडू लागला होता, इतर प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडत अडकलेल्या प्रवाशाचा बचाव केला.
हेही वाचा : गोदावरीत अंघोळीला उतरले, एकाच कुटुंबातले 5 तरूण बुडाले, बाजूलाच बोट असूनही...
रेल्वे थांबताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. अशावेळी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. परिस्थिती हाताळण्यात अग्निशमन दलाला यश आल्याची माहिती समोर आली आहे.