CSIR NBRI Recruitment 2025: सरकारी नोकरी पाहणाऱ्या युवकांसाठी नव्या भरतीची बातमी समोर आली आहे. CSIR नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, लखनऊ येथे तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक या रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 3 मे पासून सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2025 आहे. या भरतीसाठी पात्र असलेले उमेदवार ऑनलाइन माध्यामातून nbri.res.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरू शकतात.
ADVERTISEMENT
अर्ज करण्याआधी 'या' पात्रता तपासा
शैक्षणिक पात्रता
- या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी, उमेदवाराने उल्लेख केलेल्या पदानुसार,
- ITI (आयटीआय) उत्तीर्ण
- 12 वी उत्तीर्ण असण्यासोबतच अप्रेंटिस
- इंटरमीडिएट सोबत टायपिंगचं ज्ञान
वयोमर्यादा
यासोबतच, पदाला अनुसरुन उमेदवाराचे कमाल वय 28 ते 31 वर्षांपेक्षा अधिक नसावे. तसेच, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
अर्ज करण्यासाठी शुल्क
या भरतीमध्ये अर्ज भरण्यासाठी जनरल (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, एससी (SC) , एसटी (ST), पीएच (PH) प्रवर्गातील उमेदवारांना आणि सर्व महिला परिक्षार्थींना अर्ज भरण्यासाठी कोणतेच शुल्क लागणार नाही.
हे ही वाचा: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर IPL 2025 स्थगित, पुन्हा कधी सुरू होणार?
अप्लाय करण्याची प्रक्रिया
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम nbri.res.in अधिकृत वेबसाइटवर जा आणि भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
2. नवीन पोर्टलवर जा आणि 'register online' वर क्लिक करून आणि आवश्यक डिटेल्स भरून नोंदणी करा.
3. यानंतर, उमेदवारांनी Step 2 मधील 'Fill and Submit Application' वर क्लिक करून सर्व माहिती भरून फॉर्म भरावा.
4. Step 3 मध्ये शुल्क (लागू असल्यास) भरा आणि फॉर्म सबमिट करा. त्याची प्रिंटआउट घेऊन ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवा.
हे ही वाचा: जम्मू काश्मीरवर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा!
'या' पदांसाठी भरती
या भरतीद्वारे एकूण 30 पदे भरली जातील. यापैकी 9 पदे तांत्रिक सहाय्यकासाठी, 18 पदे तंत्रज्ञांसाठी आणि 3 पदे कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (Finance and Accounts / Store and Purchase) साठी राखीव आहेत.
ADVERTISEMENT
