Ind vs Pak: भारतावर पाकिस्तानकडून पुन्हा हल्ला, यावेळेस विमानतळ टार्गेट.. भारताने पाडले 8 मिसाइल!

मुंबई तक

08 May 2025 (अपडेटेड: 08 May 2025, 09:20 PM)

Pakistan Attacks On Jammu :  भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले.

Pakistan Attack On jammu Area

Pakistan Attack On jammu Area

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानने जम्मूत केला ड्रोन हल्ला

point

भारतानेही पाकिस्तानचे 8 मिसाईल्स पाडले

point

संपूर्ण परिसरात ब्लॅकआऊट

Pakistan Attacks On Jammu :  भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानचे नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. तसच आज गुरुवारी भारताने लाहोर येथील पाकिस्तानचे डिफेन्स एअर सिस्टम ड्रोनच्या माध्यमातून उखडून टाकली. त्यानंतर पाकिस्तानने आज जम्मू विमानतळावर ड्रोन हल्ला केला.

हे वाचलं का?

पाकिस्तानकडून जम्मूत रॉकेट हल्लाही करण्यात आला आहे. सांबामध्ये पाकिस्तानकडून मोठा गोळीबारही करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जम्मूच्या आरएसपुरा परिसरात ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. त्यामुळे या भागात सायरन वाजवण्यात येत आहे. तसच जम्मू शहरात मोबाईल नेटवर्कही जॅम झाला आहे.

भारताने पाकिस्तानचे 8 मिसाईल्सही पाडल्याची माहिती आहे. पाकिस्तानने उधमपूर, जम्मू, अखनूर आणि पठाणकोट येथे ड्रोन हल्ला केला. एका ड्रोन जम्मू विमानतळावर हिट झालाय. तर भारताच्या एअर डिफेन्सने पाकिस्तानचे तीन ड्रोन पाडले आहेत. दरम्यान, भारताचे फायटर विमान पाकिस्तानच्या दिशेनं रवाना झाले आहेत. 

सूत्रांच्या माहितीनुसार, जम्मू शहरात मोबाइल नेटवर्कही व्यवस्थित काम करत नसल्याचं समजतं आहे. त्यामुळे संपर्क साधण्यास अडथळा येत आहे. जम्मू काश्मीरमधील सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याचेही वृत्त समोर आले आहे, ज्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे, नियंत्रण रेषेजवळील कुपवाडा येथेही जोरदार गोळीबार झाल्याचे वृत्त आहे, ज्यामुळे सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत वाढली आहे.

हे ही वाचा >> एकीकडे एअर स्ट्राईक, नंतर ड्रोन हल्ला, आता धरणाचे दरवाजे उघडले... पाकिस्तानला तिसरा धक्का?

S-400 ने 8 क्षेपणास्त्रे पाडली

सुरक्षा यंत्रणांनी पुष्टी केली आहे की, पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ, सांबा, आरएस पुरा, अर्निया आणि आजूबाजूच्या परिसरांवर एकूण 8 क्षेपणास्त्रे सोडली होती, परंतु भारताच्या S-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने त्या सर्व हवेतच रोखल्या किंवा त्यांना निष्क्रिय केले. याशिवाय जम्मू विद्यापीठाजवळ दोन पाकिस्तानी ड्रोन खाली पाडण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे.

7-8 मे च्या रात्री पाकिस्तानने लुधियाना, चंदीगड आणि अमृतसरसह भारतातील 15 शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केलेला. आता पुन्हा एकदा तसाच हल्ला पाकिस्तानने केला आहे. परंतु भारतीय हवाई संरक्षण प्रणाली (S-400) मुळे हे हल्ले परतवून लावता आले आहेत.

हे ही वाचा >> एकीकडे एअर स्ट्राईक, नंतर ड्रोन हल्ला, आता धरणाचे दरवाजे उघडले... पाकिस्तानला तिसरा धक्का?

भारतीय लष्कर हाय अलर्टवर

भारत-पाकमधील परिस्थितीती सातत्याने चिघळत आहे. ही गोष्ट लक्षात घेता आता लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. लष्कर आणि बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 100 किलोमीटरच्या परिघात असलेला परिसर हा सील केला आहे. त्यामुळे आता परिस्थिती अत्यंत नाजूक झाल्याचं पाहायला मिळतंय.