Cyclone Biperjoy : चक्रीवादळाने अरबी समुद्र खवळणार, पण महाराष्ट्राला..

मुंबई तक

06 Jun 2023 (अपडेटेड: 06 Jun 2023, 12:30 PM)

अरबी समुद्रात (Arabian sea) चक्रीवादळाची (Cyclone Biperjoy) स्थिती निर्माण झाली आहे. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे आता भारतात दाखल होणारा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

cyclone biperjoy arabian sea likely to intensify into cyclonic storm effect on monsoon

cyclone biperjoy arabian sea likely to intensify into cyclonic storm effect on monsoon

follow google news

Marathi news in today : अरबी समुद्रात (Arabian sea) चक्रीवादळाची (Cyclone Biperjoy) स्थिती निर्माण झाली आहे. गुजरातमधील पोरबंदरच्या दक्षिणेला चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. पोरबंदरच्या दक्षिणेस म्हणजेच दक्षिण पुर्व अरबी समुद्रात एक दबाव क्षेत्र तयार झाले आहे आणि ते उत्तर आणि पश्चिमेतून पुढे सरकणार आहे. यामुळे चक्रीवादळ आणखीण तीव्र होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)मंगळवारी दिली आहे. दरम्यान आधी केरळमध्ये मान्सुन 4 जूनला तर महाराष्ट्रात 9 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे आता भारतात दाखल होणारा मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (cyclone biperjoy arabian sea likely to intensify into cyclonic storm effect on monsoon)

हे वाचलं का?

भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार (IMD) गोव्याच्या पश्चिम-दक्षिण पश्चिममेपासून जवळ जवळ 920 किलोमीटर, मुंबईच्या दक्षिण -दक्षिण पश्चिममेपासून 1,120 किलोमीटर आणि पोरबंदरवरून 1,160 किलोमीटर दक्षिण आणि कराचीवरून 1520 किलोमीटर दक्षिणेत सकाळी 5.30 वाजता एक दबावक्षेत्र बनला आहे. यामुळे येत्या 24 तासात पुर्व-मध्य अरबी समुद्रात आणि दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळावाला (Cyclone Biperjoy) बांग्लादेशने बिपरजॉय नाव दिले आहे.

हे ही वाचा : मुंबईजवळ घोंघावत असलेल्या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ नाव का दिलं?

वादळाचा मान्सूवर काय परिणार होणार?

भारतीय हवामानशास्त्र विभागाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात कमी दबावाचा चक्रीवादळ तयार झाल्याने आणि त्याचा वेग वाढल्याने केरळमध्ये दाखल होणाऱ्या मान्सूनवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. खरं तर हवामान विभागाने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची संभाव्य तारीख सांगितली नव्हती.
स्कायमेट वेदरनुसार, केरळमध्ये मान्सूनला सुरुवात 8 जून किंवा 9 जूनपासून होऊ शकते. याआधी स्कायमेटने 7 जूनला केरळमध्ये मान्सूनला सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली होती. यामध्ये तीन दिवसांचा फरक अशू शकतो असे देखील त्यांनी सांगितले आहे.

मान्सून दाखल होण्याचे रेकॉर्डस

मान्सून केरळमध्ये 1 जुन रोजी, म्हणजेच साधारण सात दिवस आधी किंवा नंतर प्रवेश करत असतो.पण मे महिन्यात भारतीय हवामान विभाग आयएमडीने मान्सून 4 जूनला केरळच्या किनाऱ्यावर दाखल होण्याची माहिती देण्यात आली होती. तसेच गेल्या अनेक वर्षाचे रेकॉर्डस पाहिले असता, दक्षिण-पूर्व मान्सून गेल्या वर्षी 29 मे ला, 2021 ला 3 जूनला, 2020 ला 1 जूनला, 2019 ला 8 जूनला आणि 2018 मध्ये 29 मे ला दाखल झाला होता.

दरम्यान या चक्रीवादळामुळे मान्सून केरळमध्ये उशिराने दाखल होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होण्याची शक्यता आहे. यासह केरळमध्ये जरी उशीर झाला असला तरी देशाच्या इतर भागात मान्सून उशीरा पोहोचेल असे नाही आहे.

    follow whatsapp