Govt Job: टेक्निकल क्षेत्रांत सरकारी मिळवण्याच्या प्रयत्नात असाल, तर तुमच्यासाठी चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कडून वेगवेगळ्या रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल युनिट्समध्ये जुनिअर इंजीनिअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. IOCL च्या या भरतीअंतर्गत, एकूण 394 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी अर्ज करण्याची सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 9 जानेवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
काय आहे पात्रता?
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेड केमिकल इंजीनिअरिंग, इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स, इंस्ट्रूमेंटेशन, रिफायनरी/ पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात 3 वर्षांच्या डिप्लोमा कोर्सचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. यामध्ये जनरल, OBC आणि EWS उमेदवारांना किमान 50 टक्के गुण आणि SC/ST उमेदवारांना 45 टक्के गुण असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
IOCL च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 26 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2025 या तारखेच्या आधारे उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. तसेच, सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
अर्जाचं शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क भरावं लागेल. यासाठी सामान्य (Open), ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) प्रवर्गातील उमेदवारांना 300 ते 500 रुपये अर्जाचं शुल्क निश्चित करण्यात आलं आहे. तसेच, एससी (SC), एसटी (ST) प्रवर्गातील आणि अपंग उमेदवारांना अर्जाच्या शुल्कात पूर्ण सूट दिली जाणार आहे.
हे ही वाचा: मुंबई: "मी सरन्यायाधीश चंद्रचूड..." खोटी ओळख अन् महिलेकडून तब्बल 3.71 कोटी रुपये उकळले!
कशी होणार निवड?
लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या दोन टप्प्यांच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. यामधील कौशल्य चाचणी केवळ क्वालिफाइंग टेस्ट असून लेखी परीक्षेच्या आधारे फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
किती मिळेल वेतन?
भरतीसंदर्भातील नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जुनिअर इंजीनिअर पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना दरमहा 25,000 ते 1,05,000 पगार दिला जाईल. यासोबतच, कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, भविष्य निर्वाह निधी आणि इतर सरकारी सुविधा देखील दिल्या जातील.
हे ही वाचा: रागाच्या भरात चाकू भोसकून पत्नीची हत्या अन् नंतर, फाशी घेत आत्महत्या... शेजाऱ्यांनी सांगितलं कारण
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2. त्यानंतर, Career किंवा Recruitment सेक्शनमध्ये जा.
3. आता, Junior Engineering Assistant भरतीच्या लिंकवर क्लिक करा.
4. या लिंकवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करून घ्या.
5. रजिस्ट्रेशन केल्यानंतर, फॉर्ममध्ये माहिती भरा.
6. सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
7. प्रवर्गानुसार, अर्जाचं शुल्क भरा.
8. शेवटी, फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट काढून ती भविष्यासाठी सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT











