Satara Crime : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळच्या एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. या बेदम मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अतिक अशोक राऊत (वय 23) असे आहे. संशयित आरोपी हे खंडाळा तालुक्यातील पळशीतील आहे. या प्रकरणातील संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं शिरवळ ग्रामस्थांनी बंदटची हाक दिली आहे. या प्रकरणातील आरोपींची नावे समोर आली आहेत. तेजस भरगुडे आणि दीपक भरगुडे अशी गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत अशोक दिनकर राऊत यांनी फिर्याद नोंदवली आहे. ही घटना दि: 27 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजता घडली होती.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'त्या' निवडणुकीत आमचा पराभव, आम्हाला पुन्हा उमेदवारी द्यावी, मातोश्रीबाहेर 'तो' फोटो अन् रडारड
नेमकं काय घडलं?
घटनास्थळावर घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. याच घटनेदरम्यान, अतिक राऊतसह वडील अशोक राऊत यांना देखील बेदम मारहाण करण्यात आली होती. तेव्हा अशोक यांनी आपल्या नातेवाईकांना अतिशला रुग्णालयात नेण्यास सांगितलं होतं. तेव्हा त्यांनी मध्यरात्री अतिशला रुग्णालयात नेले होते.
मारहाणीत तरुणाचा मृत्यू
तेव्हा बेदम मारहाण केल्याचं आढळून आले, तसेच अतिशचे कपडे देखील फाटलेल्या अवस्थेत आढळून आले होते. अतिशची प्रकृती बघता त्याला पुण्याच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण, उपचारादरम्यान, रविवारीच त्याचा मृत्यू झाला होता. ससून रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले होते.
हे ही वाचा : बीड: ऊसतोड कामगाराच्या लेकानं नाव काढलं, पीएसआय बनून बापाच्या कष्टाचं चीज केलं
या घटनेनंतर अधिकारी विशाल खांबे, पोनि यशवंत नलावडे, सपोनि किर्ती म्हस्के, सपोनि सुशिल भोसले यांनी याबाबतची सर्व पाहणी केली होती. या प्रकरणातील झालेल्या मारहाणीला कुठेतरी घातपात झाल्याच्या आरोप शिरवळ ग्रामस्थांनी केला. या घटनेनं शिरवळ परिसरात संतापाची लाट उसळळी असून शिरवळ बंदची हाक देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT











