ADVERTISEMENT
Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 29 डिसेंबर रोजी राज्यात थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांत सकाळी आणि रात्री तापमानात मोठी घट निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरले असून, थंडीची तीव्रता आणखीच वाढलेली आहे. तसेच राज्यातील काही भागांमध्ये धुके पडण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात 29 डिसेंबर रोजी हवामानाचा एकूण अंदाज.
हे ही वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अजितदादांचे शिलेदार स्वबळावर लढणार
मुंबई :
मुंबईमध्ये प्रामुख्याने कोरडं हवामान राहणार असून 29 डिसेंबर रोजी शहरातील कमाल तापमान हे 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. तर सकाळी आणि रात्री गारवा हा आणखी जाणवेल आणि राज्यात थंडीचा आणखी प्रभाव जाणवेल.
पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे या शहरात कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस असणार आहे. तसेच किमान तापमान हे 10 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस इतकं राहणार आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यात थंडीचा जोर आणखी वाढला आहे. या विभागातील प्रमुख शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान हे 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 12 अंश सेल्सिअस असेल. तसेच थंड वातावरणाची शक्यता अधिक आहे.
हे ही वाचा : मुंबईत महापालिकेसाठी काँग्रेस-वंचित आघाडीनं युतीची घोषणा केली, कोण किती जागा लढणार? आकडा समोर
विदर्भ :
विदर्भ विभागात थंडीचा प्रभाव हा कमी झालेला दिसून येत नाही. याच विभागातील प्रमुख शहर असलेल्या नागपूरात 29 डिसेंबर रोजी कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











