Govt Job: स्पोर्ट्समध्ये करिअरची स्वप्नं पाहताय? मग, क्रीडा मंत्रालयाच्या 'या' नव्या योजनेसाठी करा अप्लाय...

क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक नवी इंटर्नशिप स्कीम लाँच करण्यात आली आहे.

क्रीडा मंत्रालयाच्या नव्या योजनेसाठी करा अप्लाय..

क्रीडा मंत्रालयाच्या नव्या योजनेसाठी करा अप्लाय..

मुंबई तक

• 02:11 PM • 27 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

स्पोर्ट्समध्ये करिअरची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी

point

क्रीड मंत्रालयाच्या 'या' नव्या योजनेसाठी करा अप्लाय...

Govt Job: क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्रात करिअरचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून एक नवी इंटर्नशिप स्कीम लाँच करण्यात आली आहे. यासाठी 5.3 कोटी रुपयांचं बजेट ठेवण्यात आलं असून यामध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना स्टायपेंड सुद्धा दिलं जाणार आहे. या माध्यमातून तुम्हाला क्रीडा (स्पोर्ट्स) क्षेत्राशी संबंधित कार्याचा अनुभव घेण्याची आणि पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे.  

हे वाचलं का?

क्रीडा मंत्र्यांनी दिली माहिती... 

या इंटर्नशिप योजनेद्वारे, क्रीडा प्रशासन, विज्ञान आणि यासंबंधित क्षेत्रातील तज्ञांची एक चांगली टीम तयार करणे हे सरकारचं उद्दिष्ट आहे. ज्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे, असे उमेदवार या भरतीमध्ये सहभागी होऊ शकतात. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांच्या मते, ही नवीन योजना खेळांच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासा महत्त्वाची भूमिका बजावेल.

या इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून, तब्बल 452 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना MYAS आणि त्याच्याशी जोडलेल्या मुख्य संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळेल. 

तीन प्रमुख संस्थांचा समावेश 

1. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI): भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतातील खेळांना प्रोत्साहन देते. ते प्रतिभावान खेळाडू समोर आणून त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार करते.

2. राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्था (NADA):ही संस्था खेळांमध्ये डोपिंग (मादक पदार्थ) रोखण्यासाठी काम करते. खेळाडूंनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते.

3. राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळा (NDTL): ही एक टेस्टिंग लॅबोरेटरी असून याद्वारे, खेळांमध्ये डोपिंग चाचण्या घेतल्या जातात. 

हे ही वाचा: आधी दोन्ही मुलांना फासावर लटकवलं, नंतर आईने स्वत:लाच संपवलं... धक्कादायक घटनेने खळबळ

काय आहे पात्रता? 

या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना स्पोर्ट्स मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया अँड कम्युनिकेशन्स, कायदेशीर प्रकरणे, आयटी सिस्टिम अशा जवळपास 20 हून अधिक डोमेनमध्ये काम करता येणार आहे. यामध्ये, कोणत्याही विषयातून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार सहभाही होऊ शकतात. मंत्रालय लवकरच त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर या यासाठी अर्जा करण्याची माहिती प्रकाशित करेल, त्यानंतर उमेदवार नोंदणी करू शकतील. 

हा इंटर्नशिप प्रोग्राम दरवर्षी जानेवारी ते जुलै दरम्यान सुरू होईल. अर्ज केल्यानंतर, नियुक्त झालेल्या उमेदवारांना ऑनबोर्डिंग प्रक्रिया फॉलो करावी लागेल. यामध्ये एक्सपर्ट्सकडून त्यांचं सिलेक्शन होईल. 

    follow whatsapp