ADVERTISEMENT
Maharashtra Weather : राज्यात एकंदरीत कोरडे वातावरण राहण्याची हवामान विभागाने शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) च्या अंदाजानुसार, राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान सामान्य राहील. चला तर जाणून घेऊयात 31 डिसेंबर रोजी राज्यातील हवामानाचा अंदाज.
हे ही वाचा : जळगाव महापालिकेवर 2018 च्या निवडणुकीत कमळ फुललं, आता 2025-26 मध्ये काय होणार?
कोकण विभाग :
कोकणातील मुंबईमध्ये 31 डिसेंबर रोजी राज्यात डिसेंबर महिन्याच्या अंतिम काही दिवसांत शहरात थंडावा पसरण्याची शक्यता आहे. तसेच दुसरीकडे धुके आणि वातावरण निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे :
पश्चिम महाराष्ट्रासह पुण्यात हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज राहिल अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच यामुळे सकाळी थंडावा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रातील नाशिकसारख्या भागात रात्रीचे तापमान हे 13 अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच धुके पसरण्याची शक्यता आहे.
मराठवाडा विभाग :
मराठवाड्यात हवामान विभागाने औरंगाबाद आणि सोलापूरसारख्या भागात 28 अंश सेल्सिअस तापमनाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच उत्तरेकडील भागात ढग दिसून येण्याची शक्यता आहे.
विदर्भ विभाग :
हे ही वाचा : मीरा-भाईंदर महापालिका निवडणूक 2017 मध्ये भाजपची एकहाती सत्ता, 2025-26 या वर्षात काय होणार?
विदर्भातील नागपुरात 31 डिसेंबर रोजी कमाल तापमान हे 30 अंश सेल्सिअस इतकं असण्याची शक्यता आहे. या विभागात हिवाळ्यात वातावरण सामन्य राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ADVERTISEMENT











