लातूर हादरलं! नराधमानं दारू पिऊन अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून केला अत्याचार, नंतर पीडितेला रिक्षात टाकून...

Latur Crime : लातूरच्या निलंगा शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका ऑटो चालकाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Latur crime

Latur crime

मुंबई तक

30 Dec 2025 (अपडेटेड: 30 Dec 2025, 05:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेच्या घरात घुसून अत्याचार 

point

लातूरच्या निलंगा शहरात धक्कादायक प्रकरण उघडकीस

Latur Crime : लातूरच्या निलंगा शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. एका ऑटो चालकाने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं लातूरातील निलंगा शहरातील पारधी वस्ती हादरून गेली आहे. या प्रकरणात आता निलंगा पोलिसांनी आरोपी रिक्षा चालक योगेश खोमणेच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : नागपुरात अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, उमेदवारी न दिल्याने थेट ऑफिस फोडलं

पीडितेच्या घरात घुसून अत्याचार 

पीडित मुलगी ही घरात एकटीत असताना योगेश खोमणे हा दारूच्या नशेत पीडितेच्या घरात घुसला होता. नराधमाने पीडितेवर जबरदस्ती करत अत्याचार केला. नंतर तिला रिक्षात टाकून पळवून नेले. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

आरोपीवर अॅट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा

घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात फरार झालेल्या आरोपीचा शोध घेताना मध्यरात्री पेठ परिसरातून आरोपी योगेश खोमणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी आता निलंगा पोलीस ठाण्यात बलात्कार, अपहरण अॅट्रॉसिटीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निलंगा पोलीस करताना दिसत आहेत.

हे ही वाचा : साताऱ्यातील शिरवळमध्ये वडिलांसह तरुणाला बेदम मारहाण, लेकाला दुर्दैवीपणे संपवलं, अख्ख गाव पेटून उठलं

अशातच या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी देखील मागणी स्थानिक नागरिकांकडून होताना दिसत आहे.

    follow whatsapp