Yavatmal News: यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील भिसनी गावातील एका कुटुंबाचा आनंद क्षणार्धात दु:खात बदलला. नवजात बाळाच्या जन्मानंतर पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी निघालेल्या पित्याचा वाटेतच अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT
नवजात बाळाला रुग्णालयात भेटण्यासाठी गेले अन्...
श्रीकांत नागोराव रामगडे (वय 36, रा. भिसनी) असे मृत तरुणाचं नाव आहे. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी पांढरकवड्यातील शासकीय रुग्णालयात दाखल होती. काही वेळातच तिने एका तिच्या मुलाला जन्म दिला. ही आनंदाची बातमी कळताच श्रीकांत यांनी गावातील लोकांना ही खुशखबर सांगितली. आपल्या आठ वर्षीय मुलाला सोबत घेऊन ते दुचाकीवरून रुग्णालयात आपल्या पत्नी आणि बाळाला भेटण्यासाठी निघाले. सोमवारी संध्याकाळी ते घराबाहेर पडले. दरम्यान, अंधार असल्यामुळे त्यांना वाटेत उभा असलेला ट्रॅक्टर दिसला नाही आणि त्यामुळे, पीडित श्रीकांत यांची बाईक त्या ट्रॅक्टरवर धडकली.
हे ही वाचा: मोठी बातमी : महापालिका निवडणुकीत भाजपने खाते उघडले, मतदानापूर्वीच दोन नगरसेविका विजयी
उपचारापूर्वीच श्रीकांत यांचा मृत्यू
या भीषण अपघातात श्रीकांत यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि त्यांचा मुलगा सुद्धा या अपघातात गंभीररित्या जखमी झाला. संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचले. घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या श्रीकांत आणि त्याच्या मुलाला तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारापूर्वीच श्रीकांत यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: ठाणे : उमेदवारी अर्ज भरताना धावपळ अन् तणाव, परतताना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दुर्दैवी घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये शोककळा
पांढरकवडा पोलिसांना या प्रकरणाची मिळताच, त्यांनी तपास सुरू केला आणि ट्रॅक्टरच्या मालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनाने श्रीकांत अतिशय आनंदात होते, मात्र त्यांच्यासोबत ही भीषण घटना घडेल याची त्यांना कल्पना सुद्धा नव्हती. श्रीकांत यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये अचानक शोककळा पसरली. काही तासांपूर्वी गावभर पसरलेली आनंदाची बातमी आता दु:खद घटनेने बदलली गेली.
ADVERTISEMENT











