जालन्यात विवाहितेचा अमानुष छळ, माहेरहून पैसे आणण्यास टाकला दबाव, पीडितेनं गळफास घेत संपवलं जीवन

मुंबई तक

• 01:16 PM • 16 Feb 2026

Jalna Crime : जालन्या जिल्ह्यात एका विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी सासरच्या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नााव रिंकी महेंद्र मेखे असे आहे. संबंधित प्रकरणात विजेंद्र सुरेश गांजले यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

Jalna Crime

Jalna Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जालन्यात विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेत संपवलं जीवन

point

सासरच्यांकडून घर बांधण्यासाठी महिलेला 50 हजारांची केली मागणी 

Jalna Crime - गौरव साळी : जालन्या जिल्ह्यात एका विवाहित महिलेनं राहत्या घरात गळफास घेत आपलं जीवन संपवलं. या प्रकरणी सासरच्या तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचं नााव रिंकी महेंद्र मेखे असे आहे. संबंधित प्रकरणात विजेंद्र सुरेश गांजले यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : मेडिकलवाला नृत्यांगनेचा डान्स पाहायला धाराशिवला गेला, येताना मित्रांनी दारु पाजून जीव घेतला, मृतदेह दारात टाकला

सासरच्यांकडून घर बांधण्यासाठी महिलेला 50 हजारांची केली मागणी 

तक्रारीनुसार, रिंकी या मृत महिलेचा 31 डिसेंबर 2018 रोजी महेंद्र शरद मेखे नावाच्या तरुणाशी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघांचा सुखाचा संसार सुरु होता, पण मध्येच घर बांधण्याचा विषय निघाला असता, नवरा महेंद्र, मामेसासरे अनंता घानार आणि मामेसासू सुनिता अनंता घानार यांनी घर बांधण्यासाठी माहेरहून 50 हजारांची मागणी केली. सासरच्यांनी तिला मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला, असं तक्रारीत नमूद केलं.  

मानसिक त्रासाला कंटाळून पीडितेनं गळफास घेतला

त्यानंतर तिने आपलं माहेर गाठलं आणि आईसह नातेवाईकांना ही घटना सांगितली, पण नातेवाईकांनी तिला पुन्हा सासरी पाठवलं होतं. नंतर काही दिवसांपासून पुन्हा तिचा छळ वाढल्याची माहिती समोर आली, तिनं तिच्या बहि‍णींना देखील ही गोष्ट सांगितल्याची माहिती फिर्यादीत नमूद केलं होतं.  14 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रिंकीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येची माहिती विजेंद्र गांजले यांना मिळाली असता, गांजले कुटुंबिय जालनात दाखल झाले होते. रिंकीला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली, त्यानंतर गांजले कुटुंबीय जालन्यात दाखल झाले. त्यावेळी रिंकीला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे समजले. कुटुंबिय रुग्णालयात दाखल झाले असता, डॉक्टरांनी तिचा तपास करत तिला मृत घोषित केलं. 

हे ही वाचा : आई गावाला गेली, रात्री घरात बाप अन् मुलगी दोघंच; सकाळी 21 वर्षीय मुलीने मैत्रिणींना सांगितला धक्कादायक प्रकार

या प्रकरणी नवरा महेंद्र, अनंता घानार आणि सुनिता घानार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.