फरीदाबादमध्ये छापे अन् डॉ. उमर मोहम्मद भीतीने कापू लागला, जागेवर नवा कट रचला, तपासात मोठी माहिती समोर

Delhi Car blast : फरीदाबादमध्ये छापे अन् डॉ. उमर मोहम्मद भीतीने कापू लागला, जागेवर नवा कट रचला, तपासात मोठी माहिती समोर

Delhi Car blast

Delhi Car blast

मुंबई तक

11 Nov 2025 (अपडेटेड: 11 Nov 2025, 10:09 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

फरीदाबादमध्ये छापे अन् डॉ. उमर मोहम्मद भीतीने कापू लागला

point

जागेवर नवा कट रचला, तपासात मोठी माहिती समोर

Delhi Car blast : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनच्या बाहेर कारमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट झालं आहे. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी आहेत. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, कारमध्ये स्फोटक बसवून हा हल्ला करण्यात आला होता. आतापर्यंतच्या तपासात हे उघड झालं आहे की लाल किल्ला ब्लास्टचा संबंध फरीदाबादमधील दहशतवादी मॉड्यूलशी आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या कारमधील मृतदेहाचा डीएनए तपास करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यातून हे स्पष्ट होईल की कारमध्ये बसलेला व्यक्ती हा डॉक्टर उमर मोहम्मदच होता का? गुप्तचर यंत्रणांना संशय आहे की I-20 कारमध्ये डॉक्टर उमर मोहम्मदच होता. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो काळ्या रंगाचा मास्क घातलेला दिसत आहे.

फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर सापडलेल्या अमोनियम नायट्रेटच्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिस आणि इतर तपास यंत्रणा डॉक्टर उमर मोहम्मदचा शोध घेत होत्या. हा उमर मोहम्मद फरीदाबाद टेरर मॉड्यूलचा दहशतवादी असून, तो काही दिवसांपासून फरार होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी उमर मोहम्मद कारमध्ये एकटाच होता. त्याने आपल्या दोन साथीदारांसोबत हल्ल्याची योजना आखली होती. फरीदाबाद मॉड्यूलमधील अनेक अटक झाल्यानंतर उमर मोहम्मदला स्वतःच्या अटकेची भीती वाटू लागली. त्यामुळे घाबरून त्याने आत्मघाती हल्ल्याची योजना आखली. कारमध्ये डेटोनेटर बसवून त्याने स्फोट घडवला.

कारचा कुठे कुठे फिरली आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय सापडलं?

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या I-20 कारचा संपूर्ण सीसीटीव्ही रूट ट्रॅक केला आहे.

1. ही कार शेवटची बदरपूर बॉर्डरवर दिसली, तेथून ती दिल्लीमध्ये प्रवेश करताना दिसते.

2. त्यानंतर ती लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ दिसते.

3. यापूर्वी ही कार सुमारे 3 तास सुनहरी मशिदीजवळील पार्किंगमध्ये उभी होती. ती दुपारी 3 : 19 वाजता पार्किंगमध्ये गेली आणि सायंकाळी 6 : 48 वाजता बाहेर पडली. जवळपास 6 : 55 वाजता स्फोट झाला.

4. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे, ज्यात कार पार्किंगमध्ये जाताना आणि बाहेर येताना दिसते. त्यात उमर मोहम्मद एकटाच असल्याचं स्पष्ट होतं. सध्या पोलिस दरियागंज मार्गावरून गेलेल्या गाड्यांची तपासणी करत आहेत आणि 100 हून अधिक सीसीटीव्ही क्लिप्स तपासल्या जात आहेत.

I-20 कारचा जम्मू-कश्मीर कनेक्शन :

5. ज्या I-20 कारचा वापर हल्ल्यात झाला ती कार सुरुवातीला मोहम्मद सलमान या व्यक्तीच्या नावावर होती. त्याने ती नदीम नावाच्या व्यक्तीला विकली. नदीमने पुढे ती “रॉयल कार झोन” (फरीदाबाद) या डीलरला विकली. त्यानंतर ती तारिकने घेतली आणि शेवटी उमरकडे आली. ही कार हरियाणातील गुरुग्राम नॉर्थ RTO मध्ये HR 26 7624 या क्रमांकाने नोंदणीकृत होती.

6. पोलिसांनी काल रात्री पुलवामातील संबूरा येथून तारिकला ताब्यात घेतलं आहे. मात्र गाडीची RC त्याच्या नावावर नाही. 2015 मध्ये त्याने ही कार उमरला दिली होती. पोलिसांनी तारिक आणि आमिर या दोघांचीही चौकशी सुरू केली आहे.

7. सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं होतं की कारमध्ये तिघे होते. मात्र, तपासानंतर स्पष्ट झालं की कारमध्ये फक्त उमर मोहम्मदच होता.

8. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की “हा स्फोट चालत्या Hyundai I-20 मध्ये झाला. शिवाय यामध्ये काही विचित्र बाबी आढळल्या आहेत. सर्व शक्यता तपासल्या जात आहेत.”

पोलिसांकडून झालेली कारवाई

9. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात UAPA कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे कलम दहशतवादी कृत्यांशी संबंधित आहेत. तसेच स्फोटक पदार्थ कायदा कलम 3 आणि 4, तसेच खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या कलमांचाही समावेश केला आहे.

10. स्पेशल सेलने फरीदाबाद क्राईम ब्रँच आणि जम्मू-कश्मीर पोलिसांकडून तिथे सापडलेल्या स्फोटकांबद्दल माहिती मागवली आहे. प्राथमिक तपासानुसार, लाल किल्ला ब्लास्टमध्ये अमोनियम नायट्रेटचे अंश असण्याची शक्यता आहे. त्याची खात्री FSL अहवाल आल्यानंतरच होईल.

फरीदाबाद टेरर मॉड्यूलचं कनेक्शन

हा हल्ला फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी जोडलेला आहे. या मॉड्यूलचा उलगडा नुकताच जम्मू-कश्मीर पोलिसांनी केला होता. यात जैश-ए-मोहम्मद आणि अंसार गजवात-उल-हिंद या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित आरोपी कार्यरत होते. या मॉड्यूलमध्ये दोन पुरुष आणि एक महिला डॉक्टर सामील होती. या प्रकरणात पोलिसांनी फरीदाबादचे डॉ. मुजम्मिल अहमद गनई, पुलवामाचे डॉ. आदिल अहमद राथर आणि लखनौच्या डॉ. शाहीन शाहिद यांना अटक केली आहे. मात्र, या स्फोटाशी संबंधित दहशतवादी डॉक्टर उमर मोहम्मदचा शोध सुरू आहे. फरीदाबादमध्ये सापडलेल्या स्फोटक प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 आरोपींना अटक केली असून, सुमारे 2,900 किलो स्फोटक पदार्थ, मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि अनेक आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

i20 कार 3 तास सुनहरी मशीदजवळ उभी होती, जागेवरुन निघताच अवघ्या 4 मिनिटात... Delhi Car Blast बाबत हादरवून टाकणारी माहिती

    follow whatsapp