Dharashiv Crime News : धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादाला लागून एका पुरुषानं आपलं जीवन संपवलं आहे. कलाकेंद्रातील एका नर्तकीच्या नादाला लागून अश्रुबा कांबळे (वय 25) या तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. अशातच आता कांबळे कुटुंबीयांनी अश्रुबाच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 'या' राशीतील लोकांच्या प्रेम जीवनात रोमांचक क्षण येतील, तर काही राशींना...
धाराशिवमध्ये गोविंद बर्गे प्रकरणाची पुनरावृत्ती
कला केंद्रातील नर्तकीच्या नादाला लागून यापूर्वी गोविंद बर्गे नावाच्या एका उपसरपंचाने आत्महत्या केली. त्यानंतर आता धाराशिवमध्ये नर्तकीच्या नादाला लागून अश्रुबा कांबळेनं आपलं जीवन संपवलं आहे. धाराशिव येथील साई कला केंद्रातील नर्तकीने सततचा तगादा लावल्याचं बोललं जात आहे.
घरातील सोनं, नाणं, पैसा सर्वकाही नर्तकीनं नेलं...
नर्तकीसोबत असलेल्या प्रेमसंबंधामुळे अश्रुबा कांबळेची पत्नी त्याला सोडून गेली. नंतर घरातील सोनं, नाणं, पैसा सर्वकाही नर्तकीला दिले. एवढंच नाहीतर अश्रुबाने पोस्टातील आरडी मोडून अश्रुबा कांबळेने प्रेयसीवर पैसे उधळले. त्यानंतर नर्तकीने वारंवार अश्रुबाकडे पैशांची मागणी केली होती, असा आरोप कुटुंबियांकडून होत होता. आम्हाला न्याय हवाय, अशी मागणी आता कुटुंबियांनी केली.
हे ही वाचा : एक्सप्रेस वेवरील 'तो' पॉईंट जिथे कारमध्ये कपलचे इंटिमेंट क्षण, महिलांचे अश्लील व्हिडिओही झाले रेकॉर्ड
अश्रुबानं गळफास घेत उचललं टोकाचं पाऊल
अश्रुबा कांबळे यांचे कला केंद्रातील महिलेसोबत प्रेमसंबंधातून वाद झाले होते. नंतर त्यांनी गळफास घेत टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. अश्रुबा कांबळे हा रुई ढोकी गावाचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून अश्रुबा कांबळे आणि धाराशिवमधील कला केंद्रातील महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती आता समोर आली आहे.
ADVERTISEMENT











