धाराशिव हादरलं! नळदुर्ग किल्ल्यावरून आईने तीन मुलांसह मारली उडी, माय-लेकराचा अंत

मुंबई तक

• 06:39 PM • 03 Sep 2026

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं आपल्या तीन लहान मुलांसह उडी मारली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.

Dharashiv News

Dharashiv News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आईने तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारली

point

दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक

Dharashiv News : गणेश जाधव - धाराशिव जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेनं आपल्या तीन लहान मुलांसह उडी मारली आहे. या भीषण दुर्घटनेत आई आणि एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. तर इतर दोन मुलं गंभीर जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेनं धाराशिव जिल्हा हादरून गेला आहे. आईने नेमकं असं टोकाचं पाऊल का उचललं? असा प्रश्न उपस्थित होतोय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : विद्यानंद बापटांना मारहाण करणारा मंडळाचा मारकुट्या कार्यकर्ता कोण? कुंडली आली समोर

आईने तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी मारली

घडलेल्या घटनेनुसार, उमरगा तालुक्यातील वंताळा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी तानाजी मोहिते (वय 30) या आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर आल्या होत्या. किल्लाच्या उंच तटबंदीवरून त्यांनी आपल्या मुलांसह खाली उडी घेत जीवन संपल्याची घटना घडली. किल्ल्यावरून खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला होता. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या घटनेत अश्विनी मोहिते आणि त्यांच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. तर दोन मुलं गंभीर जखमी आहेत. 

दोन्ही मुलांची प्रकृती चिंताजनक

नागरिकांच्या मदतीने त्यांना तत्काळपणे नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर दोन्ही मुलांची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणी पुढील उपचारासाठी धाराशिव येथील सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले होते. सध्या त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली. 

हे ही वाचा : लेकाला अंमली पदार्थाचे व्यसन, आईने मुलाच्या त्रासाला कंटाळून घेतलं पेटवून

या घटनेची माहिती समोर येताच, नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेनं टोकाचं पाऊल का उचललं असाव, याचा शोध सुरू केला. यामागे तिला मानसिक तणाव होता,  की अन्य काही कारण आहे याचा पुढील तपास करण्यात आलाय. ही आत्महत्या आहे की घातपात याचा देखील शोध सुरू ठेवण्यात आला आहे.