Maharashtra Weather : येरे येरे पावसा, काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्टचा अंदाज

मुंबई तक

• 05:00 AM • 03 Sep 2026

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावलेला आढळून येत आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. जाणून घेऊयात 3 सप्टेंबर महिन्यातील राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

Maharashtra Weather (AI Generated Photo)

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचा वेग मंदावला

point

पण, कुठे पावसाचा यलो, तर कुठे ऑरेंज अलर्टचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा वेग मंदावलेला आढळून येत आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. तर काही भागांतील जिल्ह्यांना पावसाचा हलका ते मध्यम स्वरुपाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विभागांनुसार, वातावरणात काही प्रमाणात बदल जाणवण्याची शक्यता आहे. अशातच जाणून घेऊयात 3 सप्टेंबर महिन्यातील राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे.. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : शिक्षकाकडून विद्यार्थिनीला शिक्षा, पीडितेनं शाळेतच संपवलं जीवन

कोकण 

कोकण विभागातील पालघर आणि ठाणे येथे हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात वि‍जांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. धुळे आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव येथे पावसाचा यलो अलर्टची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रत पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथे हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर येथे विजांसह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा परिसर आणि पुणे घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर येथे पावसाचा यलो अलर्टचा अंदाज आहे. जालना, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड येथे विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. धाराशिवमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. 

हे ही वाचा : मुंबईत ठाकरेंना मोठा धक्का, अश्विनी भिडेंचं पत्र अन्... 'त्या' नगरसेविकेला तब्बल 6 वर्ष..

विदर्भ 

विदर्भात अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर गोंदिया, अमरावती येथे पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे.