शिक्षकाकडून विद्यार्थिनीला शिक्षा, पीडितेनं शाळेतच संपवलं जीवन

मुंबई तक

Crime News : शिक्षकाने विद्यार्थिनीला तब्बल चार तास वर्गात उभे करून ठेवले होते. विद्यार्थिनीने व्यथित होऊन कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. पीडित विद्यार्थिनी ही अकरावीच्या वर्गात शिकत होती.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शिक्षकाने विद्यार्थिनीला तब्बल चार तास केले उभे

point

विद्यार्थिनीने व्यथित होऊन संपवलं जीवन

Crime News : एका शिक्षकाने विद्यार्थिनीला तब्बल चार तास उभे करून ठेवले होते. विद्यार्थिनीने व्यथित होऊन कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारत जीवन संपवलं. पीडित विद्यार्थिनी ही अकरावीच्या वर्गात शिकत होती. ही घटना फारिदाबादच्या गाजीपुर रोड स्थित नवोदय विद्या निकेतन सीनियर सेकंडरी स्कूल येथे घडली. मात्र, मुख्याध्यापकाने हे आरोप धुडकावून लावण्याचा प्रयत्न केला.  

हे ही वाचा : Astrology : आजपासून 'षडाष्टक योग' निर्मिती, 'या' राशींवर संकट कोसणार

नेमकं काय घडलं? 

घडलेल्या घटनेनुसार, डबुआ येथील गाजीपुर रोड स्थित नवोदय विद्या निकेतन सीनियर सेकेंडरी शाळेच्या परिसरात मंगळवारी अकरावीत शिक्षण घेत होती. पीडितेची जान्हवी (वय 16) अशी ओळख समोर आली. या घटनेनंतर कॉलेजच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. विद्यार्थिनीच्या वडिलांनी शिक्षकाने मुलीला शिक्षा दिल्याचा आरोप केला आहे. 

शिक्षकाने विद्यार्थिनीला चार तास केलं उभं 

पीडित मृत विद्यार्थिनीचे वडील प्रमोद कुमारने आरोप केला, मंगळवारी शाळेत व्हेज बिर्याणी खाण्यावरून वाद झाला होता. या प्रकरणात पीडित मुलीने कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती, तरीही पीडितेला शिक्षा देण्यात आली. वडिलांनी आरोप केला की, जान्हवीला तब्बल चार तास उन्हात उभे करून ठेवले होते. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास शाळेची सुट्टी झाली असता, जान्हवी तिसऱ्या मजल्यावर पोहोचली होती. 

संबंधित प्रकरणात दावा करण्यात आला, विद्यार्थ्यांनीने कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारतं जीवन संपवलं. विद्यार्थिनी खाली पडल्यानंतर मोठा आवाज झाला असता, घटनास्थळी काही शिक्षक उपस्थित झाले. विद्यार्थिनीला गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.