शॉर्ट्सची नाडी अन् चार्जरने गळा आवळला, इंजिनिअर निधीची क्रूरपणे हत्या का झाली?

मुंबई तक

Crime News : 22 वर्षीय इंजिनिअर निधी पटेलच्या हत्येला आठवडा उलटूनही सुरत पोलिसांच्या हाती ठोस धागा लागलेला नाही. SIT कडून तपास सुरू असून, ओळखीच्या व्यक्तीच्या सहभागाच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

शॉर्ट्सची नाडी अन् चार्जरने गळा आवळला

point

इंजिनिअर निधीची क्रूरपणे हत्या

Crime News : इंजिनिअर निधी पटेल (वय 22) हिच्या हत्येला आठवडा उलटूनही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. सुरतमधील गोदावडी गावातील तिच्या घरी 24 ऑगस्टच्या सकाळी निधी मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणात पोलिसांना अद्याप कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पोलिसांकडून घटनास्थळी आढळलेले बोटांचे ठसे, निधीचे अलीकडील संवाद आणि इतर संभाव्य धाग्यांची तपासणी सुरू आहे. मात्र, आतापर्यंत तपासाला स्पष्ट दिशा मिळालेली नाही.

हेही वाचा : शौचालयाची खिडकी तोडली अन्... हत्या, लूट, चोरीच्या अल्पवयीन आरोपींमुळे नागपूरमध्ये खळबळ

तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना

मांडवी पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात यश न आल्याने सुरतचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली.  सुमारे 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या तपासात सहभागी आहेत. मात्र, SIT च्या तपासाला चार दिवस उलटूनही अद्याप कोणताही ठोस धागा मिळालेला नाही. त्यामुळे निधीच्या हत्येचे गूढ कायम आहे.

हेही वाचा : Personal Finance: मुलीच्या भविष्यासाठी SSY की PPF? जाणून घ्या कोणती योजना फायदेशीर