लेकाला अंमली पदार्थाचे व्यसन, आईने मुलाच्या त्रासाला कंटाळून घेतलं पेटवून

मुंबई तक

Crime News : एका महिलेनं स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. लेकाने महिलेकडे सतत पैशांची मागणी केली आणि तिला अनेकदा त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून आईने असं पाऊल उचललं.

ADVERTISEMENT

Crime News (AI Photo)
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोटचा लेक आईकडे अंमली पदार्थांसाठी करायचा पैशांची मागणी

point

मोटारसायकलचा हप्ता भरण्यासाठी लेकाने आईकडे कानातले मागितले

Crime News : पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा प्रकार आता उघडकीस आला आहे. डेयरिवाल परिसरात गुरूवारी सकाळी एका महिलेनं स्वत:वर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना समोर आली आहे. लेकाने महिलेकडे सतत पैशांची मागणी केली आणि तिला अनेकदा त्रास दिला. याच त्रासाला कंटाळून आईने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती समोर आली. महिला 80 टक्के भाजली गेल्याने तिची गंभीर परिस्थिती निर्माण झाली. 

हे ही वाचा : विद्यानंद बापटांना मारहाण करणारा मंडळाचा मारकुट्या कार्यकर्ता कोण? कुंडली आली समोर

पोटचा लेक आईकडे अंमली पदार्थांसाठी करायचा पैशांची मागणी

गंभीर जखमी झालेल्या माहिलेची पुष्पा देवी (वय 60) अशी ओळख समोर आली आहे. त्यांना पठाणकोट येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पुष्पा देवी यांचा मोठा मुलगा पवन कुमार यांने या घटनेची माहिती दिली होती. त्याने सांगितलं की, त्याचा धाकटा भाऊ हा अंमली पदार्थांच्या आहारी गेला आणि वारंवार अंमली पदार्थांसाठी व मोटारसायकलचे हप्ते भरण्यासाठी पैशांची मागणी करत होता. 

हे ही वाचा : दिरासोबत अनैतिक संबंध, संपत्तीचा हव्यासातून पतीची क्रूर हत्या, आत्महत्येचा बनाव

मोटारसायकलचा हप्ता भरण्यासाठी लेकाने आईकडे कानातले मागितले

गुरूवारी सकाळी त्याने आईचे सोन्याचे कानातले घेतले. या सततच्या त्रासामुळे त्यांना तीव्र मानसिक ताण आला होता. पवन म्हणण्यांनुसार, त्याचा धाकटा भाऊ मजुरीवर काम करतो आमि त्याने सुमारे तीन महिन्यांपूर्वी एक मोटारसायकल खरेदी केली होती. हप्ते भरण्यासाठी त्याने गुरूवारी सकाळी आईने कानातले घेतले. मोटारसायकलचा हप्ता भरण्यासाठी तो कानातले मागत होता. कानातले विकून ते हप्ता भरणार होता अशी माहिती आहे. पीडितेनं अद्याप पोलिसांना माहिती दिली नव्हती.