दिरासोबत अनैतिक संबंध, संपत्तीचा हव्यासातून पतीची क्रूर हत्या, आत्महत्येचा बनाव
Crime News : आत्महत्या म्हणून समोर आलेल्या सुमितच्या मृत्यूचे गूढ शवविच्छेदन अहवालामुळे उलगडले. पत्नी आणि दीरामधील कथित प्रेमसंबंध आणि संपत्तीच्या कारणातून हत्या केल्याचा पोलिसांचा संशय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
दीरासोबत अनैतिक संबंध
संपत्तीचा हव्यासातून पतीची क्रूर हत्या, आत्महत्येचा बनाव
Crime News : उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका महिलेने दीराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पत्नी आणि तिच्या दीराचे प्रेमसंबंध असल्याचा पोलिसांचा दावा असून, हे संबंध सुरू ठेवण्यासाठी तसेच संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी दोघांनी मिळून पतीची हत्या केल्याचा संशय आहे. हत्येनंतर मृतदेह फासावर लटकवून आत्महत्येचा बनाव करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना 31 ऑगस्ट रोजी खेतालपूर भैंसोली गावात घडली.
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
सुमितचा मृत्यू गळफासामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट
अधिकची माहिती अशी की, 35 वर्षीय सुमित याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती डायल 112 वरून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मात्र, शवविच्छेदन अहवालात सुमितचा मृत्यू गळफासामुळे नव्हे, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्या असल्याचा तपास सुरू केला. या प्रकरणी पोलिसांनी सुमितची पत्नी काजल (30) आणि तिचा दीर उमेश (30) यांना अटक केली आहे.
हेही वाचा : डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज काढणाऱ्या विद्यानंद बापटांना मारहाण, काय घडलं? VIDEO
