बापाचा मुलीच्या चारित्र्यावर संशय, लेकीची हत्या करून मृतदेह घरामागे पुरला

मुंबई तक

Crime News : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. नंतर तिची हत्या करत मृतदेह घराच्या मागील बाजून पुरण्यात आला होता. आईला आपल्याच नवऱ्यावर संशय आल्याने तिने जेसीबी बोलावून खोदकाम केले असता, हे प्रकरण उघडकीस आले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा

point

बापाच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त

point

पुरलेला मृतदेह जेसीबीने खोदला

Crime News : बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीने आपल्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. नंतर तिची हत्या करत मृतदेह घराच्या मागील बाजून पुरण्यात आला होता. आईला आपल्याच नवऱ्यावर संशय आल्याने तिने जेसीबी बोलावून खोदकाम केले असता, तिथे मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी 19 वर्षीय नवनीत कौरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी आरोपी वडिलांविरुद्ध हत्या आणि मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे ही वाचा : Astrology : शुक्र आणि राहूची महायुती, 'या' राशी ऑक्टोबरपर्यंत समृद्ध राहतील

मृत मुलीची आई सरबजीत कौर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुली होत्या, त्यापैकी मोठी मुलगी नवनीत कौरचा शिक्षण पूर्ण झाले होते. काही महिन्यांपासून प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती, मात्र काही दिवसानंतर ती परतली होती. सुमारे सहा महिन्यांपूर्वी ती तिच्या प्रियकरासोबत घरातून निघून गेली होती, पण काही दिवसानंतर पुन्हा परतली. यावरून नवरा-बायकोत वाद झाला होता. 

बापाच्या मुलीच्या चारित्र्यावर संशय व्यक्त

सरबजीत कौर यांच्या म्हणण्यांनुसार त्यांच्या पतीला दोन्ही मुलींच्या चारित्र्यावर संशय निर्माण झाला होता. 25 ऑगस्ट रोजी त्या माहेरी गेल्या आणि तिथे दोन्ही मुली या घटनास्थळी उपस्थित होत्या. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी मुलीने त्यांना फोनवर सांगितलं की, तिचे वडील घरामागे खड्डा खोदत आहेत. यानंतर त्या मुलीशी बोलू शकल्या नाहीत.  

पुरलेला मृतदेह जेसीबीने खोदला

बुधवारी नवनीत बेपत्ता झाल्याने सरबजीत कौर घरी परतल्या होत्या. त्यांनी मुलीबद्दल पतीला विचारले असता, त्याने सांगितलं की नवनीतला सहा महिन्यांसाठी एका नातेवाईकाच्या घरी पाठवण्यात आलेय यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण झाला होता. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. याच संशयाच्या आधारावर घरामागे खड्डा खोदण्याचे काम जेसीबीने करण्यात आले होते. खोदकाम करताना नवीनत कौरचा मृतदेह घटनास्थळी आढळून आला होता. प्राथमिक माहितीनुसार, सुमारे दोन दिवसांपूर्वी झालेल्या हत्येनंतर मृतदेह तिथेच पुरण्यात आला होता.