मर्डर केसमधून जामीनावर बाहेर आला, अन् आणखी एकाची केली हत्या
Gujarat Crime : अहमदाबादमध्ये घराचा ताबा आणि भाड्याच्या वादातून 25 वर्षीय अजित सिंह याची हत्या करण्यात आली. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला आरोपी जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा हत्येच्या प्रकरणात अडकला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मर्डर केसमधून जामीनावर बाहेर आला
अन् आणखी एकाची केली हत्या
Gujarat Crime News : अहमदाबादमध्ये घराचा ताबा आणि भाड्याच्या पैशांवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून 25 वर्षीय अजित सिंह याची हत्या करण्यात आली. या प्रकरणातील मुख्य आरोपी हितेश सोलंकी हा यापूर्वीच एका खून प्रकरणात दोषी ठरून जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. मात्र, जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याच्यावर पुन्हा एका तरुणाच्या हत्येचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी हितेश सोलंकी आणि त्याचा भाऊ रवी सोलंकी यांना अटक केली असून, अन्य दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
हेही वाचा : दिरासोबत अनैतिक संबंध, संपत्तीचा हव्यासातून पतीची क्रूर हत्या, आत्महत्येचा बनाव
टेरेसवरून खाली फेकून केली हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, हितेश सोलंकी याला मितेश नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. मितेश याला टेरेसवरून खाली फेकून त्याची हत्या केल्याप्रकरणी हितेशला दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणात शिक्षा भोगत असताना हितेशला जामीन मिळाला आणि तो बाहेर आला. त्यानंतर अहमदाबादमध्ये घराच्या ताब्यावरून आणि भाडे देण्यावरून सुरू असलेल्या वादात तो पुन्हा अडकला. याच वादातून अजित सिंहवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.]
हेही वाचा : सातारा : वॉशरुममध्ये अश्लील शब्द, पालकांना बोलवण्याची चर्चा अन् तरुणीची तिसऱ्या मजल्यावरुन उडी
