'तू बहिणीला प्रेग्नंट केलंस', डॉक्टरांचे रुग्णाच्या नातेवाईकांशी अश्लील वक्तव्य

मुंबई तक

Crime news : संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाला. महिला रुग्णाकडे दुर्लक्ष करत डॉ. मिश्रा यांनी कथितरित्या कुटुंबातील सदस्याला लज्जास्पद वक्तव्य केले.

ADVERTISEMENT

crime news (AI Photo)
crime news
Google CTA

बातम्या हायलाइट

point

डॉक्टरांचे रुग्णाच्या नातेवाईकांशी वाईट कमेंट

point

'तु आपल्या 22 वर्षीय बहिणीला प्रेग्नंट केलंय'

Crime news : संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात गर्भवती महिला आणि तिच्या नवजात बाळाच्या प्रसूतीनंतर मृत्यू झाला. या प्रकरणी मध्य प्रदेश राज्य सरकारने मोठी कारवाई केली. रुग्णालयाच्या प्रशासनाने यादरम्यान 2 पारिचारिकांना सस्पेंड केलेलं आहे. महिला आणि चिमुकल्याच्या मृत्यूनंतर रुग्णालयाचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची माहिती जनसत्ता या वृत्तमाध्यमाने दिली आहे. 

हे ही वाचा : बापाचा मुलीच्या चारित्र्यावर संशय, लेकीची हत्या करून मृतदेह घरामागे पुरला

नेमकं काय घडलं? 

मध्य प्रदेशातील रीव जिल्ह्यातील हटला येथील रहिवासी कल्पना मिश्राशी जोडण्यात आलेल्या 25 ऑगस्ट रोजी संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 26 ऑगस्ट रोजी रात्री 8.30 वाजता कल्पना मिश्रा यांची सर्जरी झाली. यानंतर तिची तब्येत अगदीत खालावली होती, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. एवढंच नाही,तर लहान बाळाचा देखील मृत्यू झाल्याची घटना आहे. 

या प्रकरणात मृत महिला कल्पनाच्या कुटुंबियांनी रुग्णालयाच्या बेजबाबदारपणाला धारेवर धरलं. कुटुंबियांनी आरोप केला की, त्यांनी डॉक्टरांना कल्पनाच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली असता, नंतर तिच्यावर उपचार केले जावे अशी मागणी केली होती. 

दरम्यान, कल्पनाचे वडील रामशरण मिश्रा यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार ठरवलं. या प्रकरणी आरोपीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. कल्पनाही त्यांची एकुलती एक मुलगी होती, मृत्यूपूर्वी त्यांनी मदतीसाठी अनेकदा विनंती केली होती. यानंतर डॉक्टरांनी माफी देखील मागितली होती.