DIG Krishnakant Pandey daughter Samruddhi Pandey commits suicide, नागपूर : 'एम्स'मध्ये पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आपल्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक कृष्णकांत पांडे यांची मुलगी समृद्धी पांडे (वय 25, मंजिरा अपार्टमेंट, शिव कैलास, मिहान) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
त्वचारोग विभागाच्या पदव्युत्तर पहिल्या वर्षात शिकत होती
समृद्धी 'एम्स'मधील त्वचारोग विभागाच्या पदव्युत्तर पहिल्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती एका मैत्रिणीसह त्या फ्लॅटमध्ये राहत होती. बुधवारी सकाळी तिची मैत्रीण कॉलेजला गेल्यानंतर समृद्धी घरी एकटी होती. रात्री आठच्या सुमारास ती परत आल्यावर दरवाजा आतून बंद असल्याचे तिला आढळले. दरवाजा उघडून पाहिले असता समृद्धीने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले.
हेही वाचा : पिंपरीत नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध, खुनाची दिली सुपारी, भररस्त्यातच अडवून थेट मानेवरच... धक्कादायक कांड
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. समृद्धीच्या कुटुंबीयांनाही त्वरित संपर्क करण्यात आला. सोनेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अभ्यासात अत्यंत गुणी असूनही समृद्धी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावातून जात असल्याची माहिती पुढे येत आहे. मात्र तिने अशा अत्यंत टोकाच्या निर्णयापर्यंत का जावे लागले, याचा तपास सुरू असून अद्याप ठोस कारण स्पष्ट झालेले नाही.
'एम्स'च्या विद्यार्थ्यांमध्ये वाढता तणाव?
याआधी ऑगस्ट महिन्यातच 'एम्स'च्या वसतिगृहात राहणाऱ्या संकेत दाभाडे (वय 22, जिंतूर, परभणी) या विद्यार्थ्यानेही गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सतत घडत असलेल्या या घटना विद्यार्थ्यांवर नेमका कोणता दबाव आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











