पिंपरीत नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध, खुनाची दिली सुपारी, भररस्त्यातच अडवून थेट मानेवरच... धक्कादायक कांड

मुंबई तक

pune Crime : प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या तरुणीच्या प्रियकरावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात प्रियकर विकास बाळासाहेब केदारी हा गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे.

ADVERTISEMENT

pune crime
pune crime
social share
google news

बातम्या हायलाइट

point

प्रियकर विकासच्या मानेवर गोळीबार

point

विकासची प्रकृती चिंताजनक

Pune Crime : प्रेमसंबंधातून सुपारी देऊन नातेवाईक असलेल्या तरुणीच्या प्रियकरावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना आहे. या प्रकरणात प्रियकर विकास बाळासाहेब केदारी हा गंभीरपणे जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आहे. अभिजीत संतोष केदारी (वय 26), नितीन ज्ञानदेव केदारी (वय42) आणि आकाश अण्णा भोकसे (वय 26) अशी आरोपींची नावे समोर आली आहेत. त्यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं असून ही घटना पिंपरीत घडली आहे.

हे ही वाचा : जालन्यात भावाचे वहिनीसोबत अनैतिक संबंध, सख्खा भाऊ ठरत होता अडथळा, नंतर कुऱ्हाडीनेच हल्ला करत तोडलं...

प्रियकर विकासच्या मानेवर गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, विकासचे ज्या तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. त्याच तरुणीच्या नातेवाईकांना राग अनावर झाल्याने अभिजित नितीन केदारी आणि आकाश भोकसे यांनी विकासला जीवे मारण्याची सुपारी दिली होती. मावळ तालक्यालगत असलेल्या पुणे-मुंबई द्रुतगती मार्गानजीक असलेल्या ओझर्डे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच मंगळवारी 11 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नितीन आणि आकाशने प्रियकर विकासला रस्त्यातच अडवलं. त्यानंतर विकासच्या मानेवर गोळीबार केला आणि त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

विकासची प्रकृती चिंताजनक

ही परिस्थिती पाहून प्रत्यक्षदर्शींनी विकासला नजीकच्या रुग्णालयात नेले, दरम्यान डॉक्टरांनी विकासची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली. या प्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकासच्या भावाने फिर्यादीत अभिजीत केदारीवर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली. दरम्यान, पोलिसांनी संशयितांना माहिती दिल्यानंतर तिघांच्याही मुसक्या आवळण्यात यश आलं आहे.

हे ही वाचा : दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी डॉ. उमरचे घर केलं जमीनदोस्त, सुरक्षा दलाची कारवाई, नेमकं काय घडलं?

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी नितीन आणि आकाश यांच्यावर याआधी खून आणि शस्त्रप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. नितीनवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp