दिल्ली स्फोटातील संशयित आरोपी डॉ. उमरचे घर केलं जमीनदोस्त, सुरक्षा दलाची कारवाई, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

Delhi blast : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर कारचा स्फोट झाला होता. तो स्फोट घडवणारा दहशतवादी म्हणून डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा यंत्रणांनी हे पाऊल उचललं आहे.

ADVERTISEMENT

Delhi blast umar mohammad pulwama house destroyed incident
Delhi blast umar mohammad pulwama house destroyed incident
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्फोटात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर

point

मारुती ब्रेझा कारची चौकशी

point

खत आणि बियाणे विक्रेता ताब्यात

Delhi Blast : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील लाल किल्ल्यावर कारचा स्फोट झाला होता. तो स्फोट घडवणारा दहशतवादी म्हणून डॉ. उमर मोहम्मद याचे पुलवामा येथील घर सुरक्षा यंत्रणांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली आहे. कारवाईचा एक भाग म्हणून सुरक्षा यंत्रणांनी हे पाऊल उचललं आहे. सुरक्षा दलांने परिसराला वेढा घातला आणि संपूर्ण कारवाई नियंत्रित पद्धतीने पार पाडली होती.

हे ही वाचा : Bihar Election Result 2025 Live Update: बिहार विधानसभा निवडणूक निकाल 2025 लाईव्ह, वाचा मिनिट टू मिनिट अपडेट

स्फोटात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर

या स्फोटात अनेक महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. गुरुवारी फरीदाबादेतील अल-फलाह विद्यापीठाच्या पार्किंगमध्ये या स्फोटाशी संबंधित आणखी एक कार आढळल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कार डॉ. शाहिद यांच्या नावावर नोंदणीकृत करण्यात आली आहे, ज्यांना व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूलच्या प्रकरणात आधीच अटक करण्यात आली आहे.

मारुती ब्रेझा कारची चौकशी

फरीदाबाद पोलिसांनी सांगितलं की, जम्मू आणि काश्मीर पोलीस विद्यापीठात सापडलेल्या संशयास्पद मारुती ब्रेझा कारची चौकशी करण्यात आली आहे. अशातच संशयास्पद कार आढळल्यानंतर, बॉम्ब पथकाला वाहनाची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. विद्यापीठ कॅम्पसमधील पार्क केलेल्या इतर वाहनांची देखील तपासणी करण्यात आली. तसेच एन्क्रिप्टेड स्वीस अॅप वापरून दहशतवादी कट रचण्यातच आला होता, असे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp