19 मिनिटांचा प्रायव्हेट क्षण असणारा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केली आत्महत्या? सत्य काय?

मुंबई तक

30 Nov 2025 (अपडेटेड: 30 Nov 2025, 01:29 PM)

digital creator sofik sk video truth about leak suicide claims : 19 मिनिटांचा प्रायव्हेट क्षण असणारा व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केली आत्महत्या? सत्य काय?

digital creator

digital creator

Google CTA

बातम्या हायलाइट

point

19 मिनिटांचा प्रायव्हेट क्षण असणारा व्हिडीओ व्हायरल

point

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर केली आत्महत्या? सत्य काय?

digital creator sofik sk video truth about leak suicide claims : पश्चिम बंगालमधील लोकप्रिय डिजिटल कंटेंट क्रिएटर सोफिक एसके आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा प्रायव्हेट व्हिडिओ गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लीक होऊन व्हायरल झाल्याने प्रचंड गदारोळ माजला होता. या व्हिडिओमुळे केवळ त्यांचे खासगी आयुष्य उघडे पडले नाही, तर त्यांच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम झाला. ट्विटर, टेलिग्राम आणि यूट्यूबसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर हा संवेदनशील व्हिडिओ झपाट्याने व्हायरल झाल्यानंतर कंटेंट क्रिएटर्सच्या गोपनीयतेबद्दल गंभीर चर्चा सुरू झाली होती. याच दरम्यान, त्या दोघांनी आत्महत्या केल्याची अफवा जोरात पसरली आणि संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले. मात्र आता या चर्चांचा भांडाफोड झाला असून आत्महत्येच्या दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, सोफिक एसके आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा सुमारे 19 मिनिटांचा एक खासगी व्हिडिओ अनवधानाने रेकॉर्ड झाला. काही अनोळखी व्यक्तींकडून तो लीक झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. लाखो युजर्सनी तो पाहिला, प्रतिक्रिया दिल्या आणि परस्परांना फॉरवर्डही केला. या अनियंत्रित प्रसारामुळे दोघांच्याही प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर अनेक वापरकर्त्यांनी बिनधास्तपणे हा व्हिडिओ शेअर केल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले.

हेही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या 25 वर्षीय महिलेचा मृत्यू, प्रचाराला जात असताना काय घडलं?

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर काही युजर्सनी धक्कादायक दावा केला. ‘सोफिक आणि त्याच्या गर्लफ्रेंडने मानसिक ताणामुळे आत्महत्या केली’ असा मजकूर असलेली पोस्ट इंटरनेटवर फिरू लागली. काही क्षणांतच ही पोस्ट व्हायरल झाली आणि सोशल मीडिया यूजर्समध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, नंतर अनेक फॅक्ट-चेकर्सनी या दाव्यांची तपासणी केली असता, अशा कोणत्याही घटनेचा पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर ही संपूर्ण माहिती फेक असल्याचे सांगण्यात आले आणि आत्महत्येच्या अफवांना पूर्णविराम मिळाला.

सोफिक एसकेने स्वतः या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत लोकांना आवाहन केले की, हा व्हिडिओ पुढे शेअर करू नये. त्याने सांगितले की, एका चुकीच्या कृतीमुळे त्यांच्या जीवनात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अनधिकृतरीत्या खासगी कंटेंट प्रसारित होण्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा, मानसिक आरोग्य आणि भविष्य एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकते, हे या प्रकरणातून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

या घटनेमुळे डिजिटल प्लॅटफॉर्मवरील नैतिकता, गोपनीयता आणि जबाबदारी या मुद्द्यांवर पुन्हा चर्चेला चालना मिळाली आहे. कोणताही व्हिडिओ किंवा माहिती सत्यता तपासल्याशिवाय फॉरवर्ड करणे, अनोळखी पोस्ट्सना विश्वास देणे आणि अशा अफवा पसरवणे यामुळे निरपराध व्यक्तींना किती मोठा फटका बसू शकतो, हे या प्रकारातून जगासमोर आले आहे. सोशल मीडिया हाताळताना जबाबदारी, संवेदनशीलता आणि कायद्याचे भान ठेवणे का आवश्यक आहे, याचाही हा महत्त्वाचा धडा आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

 ठाण्यात मनसेला मोठा धक्का, भाजपने जिल्हाध्यक्ष फोडला; निवडणुकीच्या तोंडावर अनेक माजी नगरसेवकही गळाला