डोंबिवली : ड्रग्जविरोधात कारवाई, महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी..

मिथिलेश गुप्ता

23 May 2026 (अपडेटेड: 23 May 2026, 09:23 PM)

Dombivali crime : डोंबिवलीतील खोणी आणि पलावा परिसर पोलिसांच्या रडारवर आले. ड्रग्ज तस्करी आणि बेकायदेशीर वास्तव्याविरोधात ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयक्तीरित्या मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. या धडक कारवाईत 24 विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Dombivali Crime

Dombivali Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

24 विदेशी नागरिकांवर कारवाई  

point

8 लोकांकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा नव्हता

point

महिलेची चौथ्या मजल्यावरून उडी मारली अन्..

Dombivali Crime : डोंबिवलीतील खोणी आणि पलावा परिसर पोलिसांच्या रडारवर आले. ड्रग्ज तस्करी आणि बेकायदेशीर वास्तव्याविरोधात ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयक्तीरित्या मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले आहे. पलावा परिसरातील लोढा डाउनटाऊनमनधील हायप्रोफाईन सोसायट्यांमध्ये सुरू असलेल्या सुरू असलेल्या या तस्करीविरोधात पोलिसांनी कारवाई केली. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बीड : 'तु मेरे साथ शादी कर वरना..', हात धरून तरूणाचा पीडितेवर...

इतर नागरिकांसह 4 अल्पवयीन मुलांसह समावेश 

नवी मुंबई पोलीस आणि मानपाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने सकाळी सात ते बारा वाजण्याच्या सुमारात या प्रकरणात शोधमोहिम राबविली होती. याच मोहिमेत 150 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. या धडक कारवाईत 24 विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, ज्यात 14 पुरूष, 6 महिला आणि 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. प्राथमिक तपासतून संबंधित लोक हे नायझेरिया, युगांडा आणि घाना येथील असल्याचे सांगण्यात येते. 

8 लोकांकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा नव्हता

पोलीस तपासातून काही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. यापैकी 8 लोकांकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा नसल्याचे आढळून आले, तर 9 जणांविरूद्ध विविध पोलीस ठाण्यात NDPS कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. काही लोकांचे पासपोर्ट हे न्यायालयीन प्रक्रियेमुळे जप्त करण्यात आले, अशी माहिती पोलिसांना सांगितली. 

चौथ्या मजल्यावरून उडी मारली अन्..

या कारवाईदरम्यान नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मोस्ट वॉन्टेड आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणातील आरोपींचे नाव बदलून पलावा परिसरातील हायप्रोफाईल सोसायटीत राहत असल्याचे उघडकीस आले. कारवाई सुरू असताना एका नायझरियन महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली असता, ती गंभीर जखमी झाली. 

हे ही वाचा : कल्याणमध्ये तब्बल 34 कोटींच्या हेरॉईनचा साठा जप्त, मुख्य पुरवठादाराची ओळख पटली

तपासादरम्यान, काही फ्लॅटचे वैध एग्रीमेंट न करता विदेशी नागरिकांना भाडेतत्वार खोल्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी घरमालकांवरही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणातील कारवाई ही DCP अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ACP सुहास हेमाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले आहे.