डोंबिवलीत लेकीचं लग्न जुळत नव्हतं म्हणून बापानं भोंदू बाबाला गाठलं, दोष दूर करण्याच्या नावाखाली भलतंच कांड...

मिथिलेश गुप्ता

26 Mar 2026 (अपडेटेड: 26 Mar 2026, 08:52 PM)

Dombivli crime : डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित 'दोष' दूर करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत या आरोपीला कल्याण येथून अटक केली.

Dombivli crime

Dombivli crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

point

विधीदरम्यान आरोपीने दागिन्यांच्या रुमालाचा केला खेळ

Dombivli crime : डोंबिवलीत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलीच्या लग्नातील कथित 'दोष' दूर करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने वयोवृद्ध व्यक्तीची फसवणूक केल्याची माहिती समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी दीपक सावंत या आरोपीला कल्याण येथून अटक केल्याचे वृत्त आहे. भोंदू महाराज अशोक खरात यांच्या प्रकरणानंतर राज्यात अशा घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.  

हे वाचलं का?

हे ही वाचा : डोंबिवली : शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाची शिक्षिकेला अश्लील व्हिडीओ पाठवत शरीरसुखाची मागणी; मनसेने इंगा दाखवला

वृद्ध वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी भोंदू बाबाचा मार्ग निवडला

घडलेल्या घटनेनुसार, मुलीच्या लग्नात अडथळा निर्माण होत असल्याने वृद्ध वडिलांनी मुलीच्या लग्नासाठी उपाय म्हणून भोंदू बाबाचा मार्ग निवडला, पण त्यामुळे अडचण निर्माण झाली. भोंदूने विधी करून दोष दूर करण्याचे आमिष दाखवले. नंतर विधीच्या नावाखाली त्याने पीडितांकडून सोन्याचे ब्रेसलेट आणि चांदीची लक्ष्मी नाणी घेतली होती. 

विधीदरम्यान आरोपीने दागिन्यांच्या रुमालाचा केला खेळ

विधीदरम्यान आरोपीने हे दागिने लाल रंगाच्या रुमालात ठेवण्यास सांगितले आणि चालाखीने रुमालाची अदलाबदल केली होती. नंतर दुसरा रुमाल पीडितांच्या हातात देऊन त्याने घटनास्थळावरून पळ काढला. काही वेळानंतर फसवणूक केल्याचं लक्षात येताच, पीडितांनी विष्णू नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर आली.   

हे ही वाचा : नवरा-बायकोमध्ये 10 दिवसांपासून वाद, पत्नी माहेरी गेल्यानंतर नवऱ्याने गळफास घेत आयुष्य संपवलं, घटनेनं परिसर हादरलं

तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळपणे तपास सुरु करून दीपक सावंतला कल्याण परिसरात अटक करण्यात आली. आरोपीने याआधी देखील अशा प्रकारे अनेकांना फसवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, संबंधित प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. दरम्यान, अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केल्याची माहिती आहे.