डोंबिवली : 2 अल्पवयीन मुलींना दिवस गेले, कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली, काय घडलं?

मिथिलेश गुप्ता

18 May 2026 (अपडेटेड: 18 May 2026, 10:58 AM)

Dombivli Crime News : डोंबिवलीतून दोन वेगवेगळी अत्याचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. 23 अन् 24 वर्षांच्या दोन मुलांनी या मुलींना जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण केलंय.

Dombivli Crime News

Dombivli Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

डोंबिवली : 2 अल्पवयीन मुलींना दिवस गेले

point

कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली, काय घडलं?

Dombivli Crime News, डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरातील महिला व बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण ताजे असतानाच डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या भागात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही पीडित मुली गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मानपाडा आणि रामनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचलं का?

दोन अल्पवयीन मुलींना अत्याचारातून दिवस गेले 

पहिल्या घटनेत मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्यांच्या ओळखीच्या तरुणाकडून लैंगिक अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर आरोपी काजू निषाद (23) हा उत्तर प्रदेशात पळून गेला होता. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर तिच्या कुटुंबीयांना हा प्रकार समजला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल केला. मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढत त्याला उत्तर प्रदेशातून अटक करून रात्री डोंबिवलीत आणले आहे. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा : झोपेतून उठलेल्या मुलाच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड हल्ला, पुणे हादरले, नेमकं प्रकरण काय?

दुसरी घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून शुभम सरोज याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तिचे वय सोळा वर्ष सांगितले जात आहे. शुभम हा खाजगी व्हिडिओग्राफीचे काम करतो. या प्रकरणातही पिडीत मुलगी गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शुभम सरोज (24) याला अटक करण्यात आली.

या दोन्ही घटनांपूर्वी अहिल्यानगर येथून खोपोलीला मामाकडे जाण्यासाठी निघालेल्या एका 14 वर्षीय मुलीवर सौरभ सोनवणे याने अत्याचार केल्याची घटना घडली होती. गेल्या चोवीस तासांत कल्याण आणि डोंबिवलीत तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कल्याण उपविभागातील पोलिस या तिन्ही प्रकरणांचा कसून तपास करत आहेत. आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

वकील रहीम बनला रोहन, धार्मिक कार्यात सहभागी होऊन मन जिंकले अन्..