'मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टवरून आम्ही..', प्रणित मोरेसमोर काहीही बरळणाऱ्या सेजल पवारवर KEM कडून 'ही' मोठी कारवाई

Dr Sejal Pawar : केईएम रुग्णालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला असून तिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.

Dr Sejal Pawar placed on 15-day forced leave KEM Medical student Pawar has been handed over to her family Marathi News

सेजल पवार KEM कडून मोठी कारवाई 

मुंबई तक

13 Jun 2026 (अपडेटेड: 13 Jun 2026, 04:44 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्टबाबत टिप्पणी करणाऱ्या सेजल पवारला झटका

point

KEM ची मोठी कारवाई

Dr Sejal Pawar, Mumbai KEM Hospital  : मुंबईतील प्रतिष्ठित केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनी डॉ. सेजल पवार हिने एका यूट्यूब चॅनलवर केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. कंटेंट क्रिएटर प्रणित मोरे याच्या शोमध्ये सहभागी झालेल्या सेजल पवार हिने मृतदेहांच्या संदर्भात, विशेषतः पुरुष मृतदेहांच्या शारीरिक अवयवांबद्दल अतिशय आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वैद्यकीय क्षेत्रासह सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. एका डॉक्टरकडून अशा प्रकारच्या संवेदनशील विषयावर केली गेलेली ही थट्टा वैद्यकीय नियमावली आणि नैतिकतेच्या विरोधात असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : धाराशिव : सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने 27 लाखांना लुटले, कसं टाकलं जाळं?

सेजल पवार 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर, KEM कडून कारवाई 

प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केईएम महाविद्यालय प्रशासनाने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. प्राथमिक तपासणीत व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती ही डॉ. सेजल पवारच असल्याचे निष्पन्न झाले असून, तिने केलेली विधाने प्रथमदर्शनी आक्षेपार्ह आणि पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. यावर कठोर कारवाई करत प्रशासनाने सेजल पवार हिला 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर (forced leave) पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत तिला महाविद्यालय, रुग्णालय परिसर आणि वसतिगृहात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तसेच ती कोणत्याही शैक्षणिक किंवा इतर महाविद्यालयीन उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

हेही वाचा : राजघराण्यातील सवतींमध्ये वाद, एकीने रायफल काढली अन्...; धक्कादायक प्रकरण

डॉ. सेजल पवार हिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी महाविद्यालयाने पाच सदस्यांची एक विशेष समिती नियुक्त केली आहे. या समितीमार्फत प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाणार असून, पुढील सात दिवसांत आपला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या सुरुवातीच्या चौकशीसाठी दोन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती, ज्यांचा अहवाल सादर होणे अपेक्षित होते. सध्यातरी डॉ. सेजल पवार हिला तिच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. तिने सार्वजनिक व्यासपीठावर केलेल्या वक्तव्यामुळे केवळ तिच्या प्रतिष्ठेलाच नव्हे, तर केईएमसारख्या महत्त्वाच्या संस्थेच्या प्रतिमेलाही धक्का लागला आहे, असे मानले जात आहे.

डॉक्टरांकडून मृतदेहांचा अत्यंत संवेदनशील प्रक्रियेचा असा अनादर केला जाणे, हे वैद्यकीय आचारसंहितेचे उल्लंघन मानले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनीही तिच्यावर तीव्र टीका केली होती, त्यानंतरच महाविद्यालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सेजल पवार हिच्यावर भविष्यात कोणती कठोर कारवाई केली जाणार, हे स्पष्ट होईल. सध्यातरी, तिला महाविद्यालयाच्या आवारातून बाहेर काढण्यात आले असून, ही कारवाई वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या इतर विद्यार्थ्यांसाठी एक धडा ठरणारी आहे.