जगातील पहिल्या सेक्स चॅम्पियनशीपबाबत मोठा खुलासा, संपूर्ण सत्य ऐकून व्हाल हैराण

मुंबई तक

• 03:20 PM • 06 Jun 2023

स्वीडनच्या गोथेनबर्गमध्ये 8 जून रोजी सेक्स चॅम्पियनशीप आयोजित करण्य़ात आल्याची माहिती अनेक प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली आहे. ही बातमी समोर येताच गुगलवर जगभरातून या चॅम्पियनशीप बाबत सर्च करण्यास सुरुवात झाली.

european sex championship in sweden you will be shocked to hear the whole truth

european sex championship in sweden you will be shocked to hear the whole truth

follow google news

Sex Championship : सेक्स असं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अनेकजण न ऐकल्यासारखे करतात. चार-चौघात मित्र मैत्रिणीत देखील बोलणे टाळतात. इतक्या अती महत्वाच्या असलेल्या विषयावर फक्त लाजेपोटी चर्चा होत नाहीत, असे सर्व चित्र भारतात असताना आता सेक्स चॅम्पियनशीप (Sex Championship) भरवली जाणार आहे. नेमकी ही स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? ही स्पर्धा कशी खेळवली जाणार आहे? नियम काय असणार आहेत? याची माहिती जाणून घेऊयात. (european sex championship in sweden you will be shocked to hear the whole truth)

हे वाचलं का?

स्वीडनच्या गोथेनबर्गमध्ये 8 जून रोजी सेक्स चॅम्पियनशीप आयोजित करण्य़ात आल्याची माहिती अनेक प्रसिद्धी माध्यमांतून समोर आली आहे. ही बातमी समोर येताच गुगलवर जगभरातून या चॅम्पियनशीप बाबत सर्च करण्यास सुरुवात झाली. यामुळे काही दिवसात सेक्स चॅम्पियनशीप सर्वांधिक वेळा गुगलवर सर्च केल्याची देखील समोर आले होते. मात्र खरंच अशी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे का? याची पुष्ठी झाली नव्हती.

कशी असणार आहे चॅम्पियनशीप?

मिळालेल्या माहितीनूसार, या सेक्स चॅम्पियनशीपमध्ये दररोज 6 तास स्पर्धा होणार आहे. प्रत्येक सामना हा 45 मिनिटे किंवा 60 मिनिटे खेळवला जाणार आहे. एकूण 16 प्रकारात ही स्पर्धा होणार असून ती 45 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत विविध देशातील 20 हून अधिक स्पर्धेक सहभाग नोंदवणार आहेत.

हे ही वाचा : विवाहितेचा जंगलात सापडला मृतदेह! रक्तरंजित लव्हस्टोरी मोबाईलने…

विजेता कसा ठरवणार?

सेक्स चॅम्पियनशीपचा विजेता ठरवण्यासाठी पाच जजेसचे पॅनेल बसवले जाणार आहे. यासोबत ऑडियन्सकडून देखील रेटींग मागवले जाणार आहे. यामध्ये ऑडियन्साची रेटींग 70 टक्के मान्य केली जाणार आहे तर इतर 30 टक्के रेटींग हे जज देणार आहेत. त्यामुळे गुण देण्याचा मान हा ऑडियन्सला जास्त असणार आहे. तसेच स्पर्धेसाठी 5 ते 10 गुण ठेवण्यात आले होते.

नेमकी स्पर्धा काय?

या स्पर्धेत कपलमधील समन्वय, लैंगिक संबंधांबद्दलची समज आणि एकमेकांना उत्तेजित करण्याची क्षमता, कामासुत्राने ज्ञान अशा सर्व गोष्टीचा समावेश असणार आहे. या गोष्टीचे कपलना जेवढे ज्ञान असेल,तितके त्यांना बोनस पॉइंट मिळणार आहेत. या स्पर्धेच्या माहिती मिळताच अनेकांनी या स्पर्धेबद्दल गुगलकरून जाणून घेतली आहे.मात्र खरंच अशी स्पर्धा होतेय का याची माहिती मिळू शकली नव्हती.

हे ही वाचा : ‘ब्युटी पार्लर ऐवजी लावलं सेक्स करायला’, तरुणीसोबत घडला हादरवून टाकणारा प्रसंग

खरंच अशी स्पर्धा होणार आहे का?

स्वीडनच्या गोथेनबर्गच्या गोथेनबर्ग पोस्टेन या पोर्टलने एप्रिल महिन्यात याबाबतची रिपोर्ट छापली होती. पोर्टलमधील बातमीनुसार, स्वीडिश सेक्स फेडरेशनच्या वतीने, स्पोर्ट्स कॉन्फेडरेशनला एक खेळ म्हणून सेक्स विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.यासोबतच या खेळाची स्पर्धा आयोजित करण्यासाठीही परवानगी मागितली होती. पण क्रीडा महासंघाने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यामुळे आता स्पष्ट झाले आहे की, अशा प्रकारची कोणती स्पर्धा होणार नाही आहे. दरम्यान अशा प्रकारे देखील स्पर्धा आयोजित करण्यात येऊ शकते आणि याबाबतचा कोणीतरी पाऊल उचलते आहे, हे पाहून अनेकांनी सेक्स चॅम्पियनशीप बाबत सर्च करायला सुरुवात केली होती.

    follow whatsapp