Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाचे वारे, 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 22 May 2026

Maharashtra weather : राज्यात हवामान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात उष्णतेचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जाणून घ्या 22 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामान बदलाचे वारे वाहू लागले

point

'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाचे वारे वाहू लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात तीन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच विदर्भात उष्णतेचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. अशातच 22 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : कोल्हापूर : इमारतीच्या 5 व्या मजल्यावरून उडी मारत इंजिनिअरनं संपवलं जीवन

कोकण 

कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याच विभागात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना हवामानाचा अधिकृत अलर्ट जारी नसला तरीही ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. याच भागांत दुपारनंतर हवामानात बदल होणार आहे. तसेच मेघगर्जनेसह पावसाची अधिक शक्यता आहे. कोल्हापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर परिसरात ढगाळ वातावरण राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तसेच पुढील काही दिवसांत राज्यात उष्णता आणि अवकाळी पावसाचं सावट राहण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्याला अधिकृतपणे कोणताही अलर्ट जारी केला नाही. काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उष्णतेचा तडाखा अधिक जाणवणार आहे. 

हे ही वाचा : बापाने लेकीचे तुकडे केले, डोकं तलावात फेकून मृतदेह सुटकेसमध्ये...

विदर्भ 

विदर्भात उष्णता कायम राहणार असून अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. याच विभागात तापमान अधिक राहणार असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.