बापाने लेकीचे तुकडे केले, डोकं तलावात फेकून मृतदेह सुटकेसमध्ये...
crime news : रेल्वे स्थानकावर छापरा-गोमतीनगर एक्स्पेरसच्या बोगी येथे एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. त्या सुटकेसमध्ये तरूणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने परिसर हादरून गेला आहे. वडिलांनी मुलीसोबत असं कृत्य का केलं असाव? असा प्रश्न उपस्थित होतोय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वडिलांनी लेकीचा खून करत मृतदेह बॉक्समध्ये भरला
आरोपीकडून गुन्ह्याचा पूर्वनियोजित कटाचा संशय
Crime News : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ रेल्वे स्थानकावर छापरा-गोमतीनगर एक्स्पेरसच्या बोगी येथे एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. त्या सुटकेसमध्ये तरूणीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आल्याने परिसर हादरून गेला. तपासातून असे उघडकीस आले की, मृत मुलगी कुशीनगर जिल्ह्यातील सेवाराही येथील रहिवासी होती, तिच्याच वडिलांनी तिची हत्या केल्याचं धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.
हे ही वाचा : बायकोनं दुसरं लग्न केलं, नवऱ्याने पेट्रोल ओतून घर पेटवलं; स्वत:ही भाजला
जीआरपीच्या तपासातून असे उघडकीस आलं की, आरोपी वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करून तिच्या शरीरीचे सहा तुकडे केले होते. तिचे डोकं गावातील तलावात फेकून दिलं, उरलेले शरीराचे अवयव प्लास्टिक आणि जुन्या कपड्यांमध्ये गुंडाळून खोक्यात ठेवले. रेल्वेगाडीत सोडून देण्यात आले.
वडिलांनी लेकीचा खून करत मृतदेह बॉक्समध्ये भरला
जीआरपी एसपी रोहित मिश्रा यांनी सांगितलं की, आरोपी वडील बिग्गन अन्सारी यांना संशय बळावला की, त्याची 16 वर्षांची मुलगी एका तरूणाशी फोनवरून बोलत होती. त्यांनी आपल्या मुलीला वारंवार समजावले आणि संपर्क तोडण्यास आग्रह देखील धरला, पण त्या किशोरवयीन मुलीने नकार दिला, तेव्हा आरोपी वडिलांना राग अनावर न झाल्याने त्यांनी आपल्या मुलीची हत्या केली.
आरोपीकडून गुन्ह्याचा पूर्वनियोजित कटाचा संशय
पोलीस तपासातून उघड झाले की, आरोपीने गुन्ह्याचा पूर्वनियोजित कट रचल्याचा संशय बळावला. त्याने पाच दिवस आधीच आपल्या पत्नी आणि दोन मुलांना नातेवाईकाच्या घरी पाठवला होता. नंतर 16 मे रोजी त्याने आपली बहिणीला आणि मेहुण्याला घरी देखील बोलावले होते. या प्रकरणी असा आरोप करण्यात आला की, त्या तिघांना मिळून किशोरवयीन मुलीची हत्या केली, नंतर तिच्या शेजारी शरीराचे तुकडे करण्यात आले होते.









