बायकोनं दुसरं लग्न केलं, नवऱ्याने पेट्रोल ओतून घर पेटवलं; स्वत:ही भाजला

मुंबई तक

Crime news : एका घरातून अचानकपणे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. काही क्षणांतच संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं. काही लोक आत अडकले होते, काही जण खिडकीतून मदतीसाठी ओरडत होते, तर काही जण बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करत होते. 

ADVERTISEMENT

crime news
crime news
google news

बातम्या हायलाइट

point

आगीच्या घटनेला वेगळं वळण

point

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं? 

Crime news : पाटणा शहरातील चौक पोलीस ठाणे परिसरातील राजाराम गली येथे बुधवारी अचानकपणे एकच खळबळ उडाली. एका घरातून अचानकपणे धूर आणि आगीचे लोट पसरले होते. काही क्षणांतच संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र निर्माण झालं. काही लोक आत अडकले होते, काही जण खिडकीतून मदतीसाठी ओरडत होते, तर काही जण बाहेर पडण्याचा प्रयत्न देखील करत होते. 

हे ही वाचा : डॉक्टरांनी लेकासाठी मोटेगावकरांकडून पेपर विकत घेतला, CBI ने आवळल्या मुसक्या

स्थानिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीत अडकलेल्यांना मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले होते. आगीत पाच जण गंभीररित्या भाजून गेले होते. सर्वांना तातडीने पाटणा येथील एनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान एकाच कुटुंबातील एका सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

आगीच्या घटनेला वेगळं वळण

सुरुवातीला हे प्रकरण आगीची एक साधी घटना असल्याचे वाटत होते, मात्र यामागे घटनेला एक वेगळंच वळण मिळालं होतं. या घटनेनं सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. महिलेचा सध्याचा पती, गोंविद कुमार यांनी सांगितलं की, हा एक अपघात नसून एक मोठा कट रचण्यात आला. संबंधित प्रकरणात असा आरोप होता की, महिलेचा पहिला पती, कन्हाई कुमारनेच आपल्याच राहत्या घराला आग लावली होती. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसलं? 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तापासणी केली असता, फुटेजमध्ये जे दिसलं, त्यातूनच हे प्रकरणाचे गूढ उलगडले. पाटणा शहर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. गौरव कुमार यांच्या माहितीनुसार, कन्हाई कुमार भाजलेल्या अवस्थेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे. तपासातून उघडकीस आले की, महिलेच्या घराला आग लागली होती, तिचे यावर्षी एप्रिलमध्ये गोविंद कुमारसोबत दुसरा विवाह झाला होता. 

हे वाचलं का?